शहरात २४८ कृत्रिम टँक, तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:09 IST2021-09-18T04:09:39+5:302021-09-18T04:09:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. २४८ कृत्रिम टँक शहरात विविध ठिकाणी लावण्यात आले ...

शहरात २४८ कृत्रिम टँक, तयारी पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. २४८ कृत्रिम टँक शहरात विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. तसेच निर्माल्य संकलनासाठीही कलश लावण्यात आले आहेत. प्रत्येक झोनमध्ये विसर्जन व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे.
शहरात कुठल्याही तलावात विसर्जन करता येणार नाही. तलावांना टीनाच्या शेडने झाकले गेले आहे.
महापौर दयाशंकर तिवारी यांनी शुक्रवारी तलावांची पाहणी सुद्धा केली. कृत्रिम टँकची माहिती घेतली. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर, उपायुक्त राजेश भगत, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे व कौस्तुभ चॅटर्जी उपस्थित होते. यावेळी गांधीसागर, फुटाळा, सक्करदरा, नाईक तलाव, सोनेगाव तलावाची पाहणी करण्यात आली.
बॉक्स
मोबाईल विसर्जन व्हॅनला हिरवी झेंडी
गणेश मूर्तीच्या विसर्जनसाठी प्रत्येक झोनमध्ये मोबाईल विसर्जन व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी महापौर दयाशंकर तिवारी यांनी गांधीबाग झोनमध्ये या व्हॅनला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी सभापती श्रद्धा पाठक, कार्यकारी अभियंता धनंजय मेंढुलकर आदी उपस्थित होते.