इंटरनेटद्वारे बँक खात्यातून २४ हजार उडविले
By Admin | Updated: July 7, 2014 00:59 IST2014-07-07T00:59:04+5:302014-07-07T00:59:04+5:30
जरीपटका येथील एका व्यक्तीच्या बँक अकाऊंट आणि एटीएमची माहिती घेऊन त्याच्या खात्यातून आरोपीने इंटरनेटद्वारा २४ हजार रुपये परस्पर काढून नेले.

इंटरनेटद्वारे बँक खात्यातून २४ हजार उडविले
नागपूर : जरीपटका येथील एका व्यक्तीच्या बँक अकाऊंट आणि एटीएमची माहिती घेऊन त्याच्या खात्यातून आरोपीने इंटरनेटद्वारा २४ हजार रुपये परस्पर काढून नेले.
भगवानदास लालचंद साधवानी (५५) रा. कथ्या साई वसनशाह चौक जरीपटका असे फिर्यादीचे नाव आहे. २१ जून रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर ०८२५२८७७३०४ या क्रमांकाच्या मोबाईलवरून फोन आला. स्वत:ला युनियन बँकेचा मॅनेजर असल्याचे सांगून त्याने बँक अकाऊंट आणि एटीएमबाबत माहिती मागितली. त्याने विचारलेल्या माहितीनुसार त्यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या अकाऊंटमधून इंटरनेटच्या माध्यमाने २४ हजार ९१९ रुपये परस्पर काढण्यात आले. याबाबत माहिती होताच जरीपटका पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(प्रतिनिधी)