काटाेलमध्ये २४ नवे काेराेनाे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:20 IST2021-02-20T04:20:49+5:302021-02-20T04:20:49+5:30
काटाेल : तालुक्यातील काेराेनाबाधितांची साखळी तुटत असतानाच पुन्हा नव्या रुग्णांची भर पडल्याने धाेका वाढला आहे. गुरुवारी (दि.१८) काटाेल शहरात ...

काटाेलमध्ये २४ नवे काेराेनाे रुग्ण
काटाेल : तालुक्यातील काेराेनाबाधितांची साखळी तुटत असतानाच पुन्हा नव्या रुग्णांची भर पडल्याने धाेका वाढला आहे. गुरुवारी (दि.१८) काटाेल शहरात १५ तर ग्रामीण भागात नऊ रुग्णांची नाेंद करण्यात आली. काेराेनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी शासनाच्या नियमावलीचे पालन करून दैनंदिन व्यवहार करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
काटाेल शहरात गुरुवारी १५ काेराेनाबाधित आढळले. यात पंचवटी येथे चार, तारबाजार येथे तीन तसेच हाेळी मैदान, पाेहकार ले-आऊट, थूल ले-आऊट, फैलपुरा, सगमानगर, लक्ष्मीनगर, देशमुखपुरा, ठाेमा ले-आऊट येथे प्रत्येकी एका रुग्णाची नाेंद झाली. तसेच ग्रामीण भागात नऊ काेराेना संक्रमित रुग्ण आढळले असून, यात काेंढाळी येथील पाच आणि वाई, लाडगाव, मेटपांजरा, पारडसिंगा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.