मास्कशिवाय फिरणाऱ्या २३ जणांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:08 IST2021-04-23T04:08:53+5:302021-04-23T04:08:53+5:30

आतापर्यंत ३७ हजार ६५६ व्यक्तींविरुद्ध कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी गुरुवारी ...

23 people fined for walking without masks | मास्कशिवाय फिरणाऱ्या २३ जणांना दंड

मास्कशिवाय फिरणाऱ्या २३ जणांना दंड

आतापर्यंत ३७ हजार ६५६ व्यक्तींविरुद्ध कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी गुरुवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या २३ नागरिकांकडून ११ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल केला. या सर्वांना मास्क देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३७ हजार ६५६ नागरिकांविरुद्ध कारवाई करून १ कोटी ७१ लाख ८७ हजाराचा दंड वसूल केला आहे.

गुरुवारी मनपा उपद्रव शोध पथकाद्वारे लक्ष्मीनगर झोनअंतर्गत ७, धरमपेठ झोन व हनुमाननगर झोनअंतर्गत प्रत्येकी १, धंतोली झोनअंतर्गत ३, नेहरूनगर झोनअंतर्गत ६, लकडगंज १ आणि आशीनगरअंतर्गत ४ जणांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई केली जात आहे.

Web Title: 23 people fined for walking without masks