लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये मंगळवारी दहशतवादी हल्ल्याची घटना घडली. यामध्ये २८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान नागपुरातूनही काश्मिरमध्ये तब्बल २२५ पर्यटक फिरायला गेले होते. या घटनेमुळे ते पर्यटकही अडकून प़डले आहेत. नागपुरातील जिल्हा प्रशासन या पर्यटकांवर बारीक लक्ष ठेवून आहे.
प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपुरातून जवळपास २२५ पर्यटक काशिम्रला पर्यटनासाठी गेले आहेत. यातील एक महिला किरकोळ जखमी झाली असून सर्व पर्यटक सुखरूप आहेत. जखमी महिलेसह काही पर्यटक नागपूरला येण्यासाठी निघाले आहेत. इतर पर्यटकांवरही जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे. अडकलेले पर्यटक व त्यांचे मित्र कुटुंब व नातेवाईकांसाठी संपर्क क्रमांकही प्रशासनाने जारी केले आहे. अडकलेल्या पर्यटकाबाबत कुठलीही माहिती असल्यास यावर संपर्क साधण्यास सांगितले आहे.
श्रीनगर येथील संपर्क क्रमांक.फोन - ०१९४-२४६३६५१, २४५७५४३, २४८३६५१वॉट्सअँप नंबर : ७७८०८०५१४४, ७७८०९३८३९७, ७००६०५८६२३जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूरकार्यालय - फोन - ०७१२-२५६२६६८अंकुश गावंडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर मोबाईल क्रमांक :८८६००१८८१७