२२० झोपडपट्टीधारकांनाही मिळणार पट्टे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:08 IST2021-01-18T04:08:48+5:302021-01-18T04:08:48+5:30
-सभागृहाच्या मंजुरीनंतर प्रस्ताव शासनाकडे पाठविणार - शासकीय व मिश्र मालकीच्या जागेवरील वस्त्यांचा प्रश्न लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...

२२० झोपडपट्टीधारकांनाही मिळणार पट्टे
-सभागृहाच्या मंजुरीनंतर प्रस्ताव शासनाकडे पाठविणार
- शासकीय व मिश्र मालकीच्या जागेवरील वस्त्यांचा प्रश्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील खासगी व मिश्र मालकीच्या जागांवर वसलेल्या २२० झोपडपट्ट्या नियमित झाल्याशिवाय या झोपडपट्टीधरकांना मालकी पट्टे देणे शक्य नाही. याचा विचार करता, जागेच्या वापरात फेरबदल करून त्या बेघरासाठी घरे यासाठी आरक्षित करण्याबाबतचा प्रस्ताव २० जानेवारीला होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. सभागृहाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव राज्य शसनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. यामुळे खासगी व मिश्र मालकीच्या जागांवरील झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
खासगी व मिश्र जागांवरील झोपडपट्ट्यांची जागा ...... बोरासाठी घरे उभारण्याकरिता आरक्षित नसल्याने मालकी पट्टे वाटपाचे काम रखडले आहे. चकरा मारूनही ........काम पट्टे मिळत नसल्याने झोपडपट्टीधारक हतबल झाले आहेत. नागपूर शहरात शासन, नागपूर सुधार प्रन्यास, महानगरपालिका व खासगी व मिश्र मालकीच्या जागेवरील झोपडपट्ट्यांतील विभागवार जागांचे सीमांकन व मोजणी जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाने केलेली नाही. दुसरीकडे शासननिर्णयानुसार ज्या विभागाच्या मालकीच्या जमिनीवर झोपडपट्टी वसली आहे, त्याच शासकीय विभागावर मालकी पट्टे वाटप करण्याची जबाबदारी आहे. परंतु, खासगी व मिश्र मालकी असलेल्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांतील पट्टेवाटपाचा मुद्दा सीमांकनाअभावी अनिर्णयावस्थेत आहे.
सभागृहाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. शासनमंजुरीनंतर या जागांवरील झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टेवाटपाचा मार्ग मोकळा होणार आहे.
.....
अशा आहेत नागपुरातील झोपडपट्ट्या
मनपा जागेवर वसलेल्या - १६
नासुप्र मालकीच्या जागेवर- ५५
महाराष्ट्र शासन -८४
रेल्वेची मालकी असलेल्या जागा -११
खासगी मालकी -८२
मिश्र मालकीच्या जागेवर -१५१
इतर शासकीय जागेवर -९
आबादी जागेवर -९
झुडपी जंगल जागेवर -९
एकूण ४२६
.....
झोपडपट्टी मालकी संख्या
घोषित झोपडपट्टी खासगी ५८
(२९९ पैकी) मिश्र ९२
...
अघोषित झोपडपट्टी खासगी २५
(१२७ पैकी) मिश्र ४५
एकूण २२०
......