22 weeks' abortion allowed: High Court's relief | २२ आठवड्यांचा विकारग्रस्त गर्भ पाडण्याची परवानगी : हायकोर्टाचा दिलासा 

२२ आठवड्यांचा विकारग्रस्त गर्भ पाडण्याची परवानगी : हायकोर्टाचा दिलासा 

ठळक मुद्देवैद्यकीय अहवाल विचारात घेतला

लोकमत  न्यूज  नेटवर्क  
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी २२ आठवड्याचा विकारग्रस्त गर्भ पाडण्याची परवानगी दिली. हा निर्णय देताना वैद्यकीय मंडळाचा अहवाल विचारात घेण्यात आला. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला.
संबंधित गर्भवती महिला वर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहे. वर्धा येथील सरकारी रुग्णालयात २९ जुलै रोजी करण्यात आलेल्या थ्रीडी स्कॅनमध्ये तिच्या गर्भाला हृदय व फुफ्फुसाचे विकार व शरीर सुजलेले आढळून आले. त्यामुळे तिने व तिच्या पतीने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. त्याची परवानगी मिळविण्यासाठी महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पहिल्या सुनावणीनंतर न्यायालयाने महिलेची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा आदेश मेडिकलच्या अधिष्ठात्यांना दिला होता. त्यानुसार, वैद्यकीय मंडळ स्थापन करून १ ऑगस्ट रोजी महिलेची तपासणी करण्यात आली. त्यात गर्भ विकारग्रस्त असल्याचे व जन्म झाल्यानंतर जगू शकणार नसल्याचे आढळून आले. त्यामुळे न्यायालयाने महिलेची याचिका मंजूर केली. वैद्यकीय मंडळामध्ये गायनॉकॉलॉजीस्ट अ‍ॅन्ड ऑबस्टेट्रिक्स, पेडियाट्रिक्स, सोनोलॉजी, कार्डियालॉजी, पल्मोनोलॉजी, न्यूरोलॉजी, जेनेटिक्स, पॅथालॉजी आदी तज्ज्ञांचा समावेश होता. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. स्विटी भाटिया यांनी कामकाज पाहिले.

Web Title: 22 weeks' abortion allowed: High Court's relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.