शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

२२ टक्के महाविद्यालयेच ‘नॅक’च्या श्रेणीत; नागपूर विद्यापीठातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:01 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पावणेसहाशेहून अधिक महाविद्यालयांचा समावेश आहे. संलग्नित महाविद्यालयांच्या दर्जावर अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात येतात.

ठळक मुद्देसुविधा व दर्जाच्या अभावामुळे महाविद्यालयांकडून पुढाकार नाही

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पावणेसहाशेहून अधिक महाविद्यालयांचा समावेश आहे. संलग्नित महाविद्यालयांच्या दर्जावर अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात येतात. मात्र ‘लोकमत’च्या हाती आलेली माहिती यावर शिक्कामोर्तब करणारीच आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एकूण महाविद्यालयांपैकी केवळ २२ टक्के महाविद्यालयेच ‘नॅक’च्या श्रेणीत आहेत. त्यातही ‘अ’ श्रेणीतील महाविद्यालयांची संख्या ही अवघी ५ टक्के इतकीच आहे. पायाभूत सुविधा, शिक्षक व दर्जाच्या अभावामुळेच महाविद्यालयांकडून ‘नॅक’च्या मूल्यांकनासाठी पुढाकार घेण्यात येत नसल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली आहे.सद्यस्थितीत नागपूर विद्यापीठात ५८४ महाविद्यालये आहेत. यापैकी ४१७ महाविद्यालये ही १० वर्षांहून अधिक जुनी आहे. तर उर्वरित १६७ महाविद्यालयांची स्थापना होऊन १० वर्षांचा कालावधी व्हायचा आहे. १० वर्षे पूर्ण झालेल्यांपैकी अवघ्या १३० महाविद्यालयांचे ‘नॅक’चे मूल्यांकन झाले असून त्यांना विविध श्रेणी प्राप्त आहे. यातही ‘अ’ श्रेणी प्राप्त महाविद्यालयांची संख्या अवघी २९ इतकीच आहे. या आकडेवारीकडे नजर टाकली असता नागपूर विद्यापीठातील महाविद्यालयांचा दर्जा कसा काय वाढणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रशासनाकडून पुढाकार नाहीनागपूर विद्यापीठाने बृहत् आराखड्यात २०१४ पर्यंत ४१७ महाविद्यालये ‘नॅक’च्या श्रेणीत आणण्याचे ध्येय मांडले आहे. मात्र यासाठी नेमकी रूपरेषा काय असणार आहे, याबाबत विद्यापीठाने भूमिका उघड केलेली नाही. बहुतांश महाविद्यालयांनी तर ‘नॅक’चे मूल्यांकन करण्यासाठी प्रक्रिया सुरूच केलेली नाही. यासाठी महाविद्यालयांना विद्यापीठानेदेखील ठोस निर्देश दिलेले नाहीत.

कसे होणार मूल्यांकन?विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयांपैकी अनेक ठिकाणी तर सुविधांचा प्रचंड अभाव आहे. ५८४ पैकी सुमारे २४० महाविद्यालयांमध्ये मान्यताप्राप्त पूर्णकालीन प्राचार्य आहेत. बहुतांश महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. अनेक महाविद्यालयांत तर पायाभूत सुविधादेखील हव्या तशा नाहीत. अशा स्थितीत महाविद्यालये कुठल्या आधारावर ‘नॅक’च्या मूल्यांकनाला सामोरे जातील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ