शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बाल तस्करीच्या संशयावरून बिहारकडे जाणारी २२ मुले ताब्यात; यवतमाळ जिल्ह्यातून पोहचली नागपुरात : रेल्वे स्थानकावर कारवाईमुळे गोंधळ

By नरेश डोंगरे | Updated: January 30, 2026 21:34 IST

शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर २२ अल्पवयीन मुले उभी होती. त्यांच्यासोबत एक मौलाना आणि दुसरा एक केअर टेकर होता.

- नरेश डोंगरे 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाल तस्करीच्या संशयावरून यवतमाळ जिल्ह्यातील मदरशातून आलेल्या २२ मुलांना येथील रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईमुळे रेल्वे स्थानक परिसरात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दिवसभराच्या चाैकशीनंतर या मुलांना चाईल्ड लाईनच्या माध्यमातून बालसुधार गृहात पाठविण्यात आले. चाैकशीनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करायची की काय, त्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर २२ अल्पवयीन मुले उभी होती. त्यांच्यासोबत एक मौलाना आणि दुसरा एक केअर टेकर होता. हे सर्व २४ जण अमृत भारत एक्सप्रेसने बिहारच्या पुर्णीया जिल्ह्यात जाणार होती. ट्रेन यायला वेळ असल्याने ते सर्व प्रतीक्षा करत होते. दरम्यान, स्टेशन मास्तरच्या नजरेस ते सर्व पडले. एवढ्या मोठ्या प्रमाणात बालके दिसतात, मात्र त्यांचे पालक दिसत नसल्याने स्टेशन मास्तरने रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिस आणि चाईल्ड लाईनला पाचारण केले. जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्याचेही पथक पोहचले. त्यांनी या मुलांची आणि माैलानाची चाैकशी केली. ही सर्व मुले यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील मदरशामध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती पुढे आली. फेब्रुवारीत रमजान असल्याने त्यांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे ते पुर्णीया (बिहार) जिल्ह्यातील आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले होते, असे माैलानांनी सांगितले. आर्णी येथील मदरशातील कागदपत्रे, तेथील नगरसेवकाचे पत्र सुद्धा माैलानाने दाखविले. त्यानंतर चाईल्ड लाईन आणि रेल्वे पोलिसांनी मुलांच्या पालकांशी संपर्क सुरू केला. सायंकाळपर्यंत मोजक्याच लोकांशी संपर्क झाल्याने या सर्व मुलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांनापाटणकर चाैकातील शासकीय बालगृहात रवाना करण्यात आले.मुले अल्पवयीन, कागदपत्रेही अपुरीमुले अल्पवयीन असल्याने आणि पुरेशी कागदपत्रे नसल्याने त्यांची तस्करी तर केली जात नाही ना, अशी शंका काही अधिकाऱ्यांना होती. त्यामुळे जीआरपीकडे तक्रार देऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काही जणांनी केली होती. मात्र, अनेक मुलांच्या पालकांशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी आणि माैलानांनी दिलेली माहिती सारखी असल्याने अन्य पालकांशी संपर्क झाल्यानंतरच कारवाईबाबत निर्णय घेण्याची भूमीका संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली.

माैलानाकडे २२ मुलांसह २४ जणांचे रेल्वेची तिकिटं आढळली. मदरसा तसेच स्थानिक नगरसेवकांचे पत्रही होते. काही मुलांच्या पालकांनी मुले शिक्षणासाठी आर्णी (जि. यवतमाळ) येथील मदरशात पाठविल्याचे सांगितले. प्रकरण संवेदनशिल आहे. अनेक पैलू तपासायचे आहे. चाईल्ड लाईनकडूनही चाैकशी केली जात आहे. त्यानंतरच गुन्हा दाखल करायचा की नाही, त्याचा निर्णय घेतला जाईल.- गाैरव गावंडेवरिष्ठ पोलिस निरीक्षक, रेल्वे पोलिस नागपूर.

English
हिंदी सारांश
Web Title : 22 Children Detained in Nagpur Suspected of Child Trafficking to Bihar

Web Summary : Nagpur Railway Police detained 22 children from Yavatmal, suspected of trafficking to Bihar. Accompanied by a Maulana, they were en route via Amrut Bharat Express. Concerns arose due to missing parental figures and incomplete documentation, leading to further investigation and placement in a children's home.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी