उमरेड : तालुक्यातील १४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. आज सोमवारी १९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यापूर्वी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून, तालुक्यातील एकूण २२ उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहे. यामध्ये खुर्सापार (उमरेड) ग्रामपंचायतीमधून एकमेव अर्ज दाखल झाला आहे. बोरगाव (लांबट) आणि सावंगी (खुर्द) ग्रामपंचायतीतून प्रत्येकी दोन अर्ज, शिरपूर आणि विरली येथून प्रत्येकी तीन तर नवेगाव (साधू) या ग्रामपंचायतीमधून सर्वाधिक ११ अर्जांचा समावेश आहे.
अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख ३० डिसेंबर असून, मंगळवारी आणि बुधवारी अर्जासाठी गर्दी उसळेल. सध्या निवडणुकीसाठी लागणाऱ्या महत्त्वपूर्ण दस्तऐवजांची जुळवाजुळव करण्यासाठीची लगबग दिसून येत होती.
--------
उमरेड तहसील कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठीही अनेकांची गर्दी दिसून येत होती.