शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
2
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
3
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
4
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
5
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
6
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
7
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
8
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
9
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
10
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
11
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
12
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
13
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
14
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
15
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
16
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
18
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
19
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील डागा रुग्णालयात २१६ नवजात शिशूंचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 21:47 IST

डागा स्मृती शासकीय रुग्णालयात वर्षभर महिला रुग्णांची गर्दी असते. गरीब व वंचित कुटुंबातील महिला प्रसुतीसह विविध कारणांसह येत असतात. या इस्पितळात ३३ महिन्यांच्या कालावधीत १२००हून अधिक प्रसुती झाल्या. तर २१६ नवजात शिशूंचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे३३ महिन्यांची आकडेवारी : महिन्याला सरासरी होतात १२००हून अधिक प्रसुती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डागा स्मृती शासकीय रुग्णालयात वर्षभर महिला रुग्णांची गर्दी असते. गरीब व वंचित कुटुंबातील महिला प्रसुतीसह विविध कारणांसह येत असतात. या इस्पितळात ३३ महिन्यांच्या कालावधीत १२००हून अधिक प्रसुती झाल्या. तर २१६ नवजात शिशूंचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत डागा इस्पितळाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१६ ते ३० सप्टेंबर २०१८ या कालावधीत ‘डागा’मध्ये बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभागात किती जणांनी उपचार घेतले, किती महिलांची प्रसुती झाली, किती नवजात शिशूंचे मृत्यू झाले, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१६ ते ३० सप्टेंबर २०१८ या कालावधीत ‘डागा’मध्ये एकूण ४० हजार ३७ प्रसुती झाल्या. याची सरासरी काढली तर दर महिन्याला १२००हून अधिक प्रसुती झाल्या. या कालावधी ३९ हजार ९२१ बालकांचा जन्म झाला. तर २१६ नवजात शिशूंचा मृत्यू झाला. ३ मातांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.सुमारे सहा लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार३३ महिन्यांच्या कालावधीत ‘डागा’मध्ये बाह्यरुग्ण विभागात ४ लाख ९३ हजार ८३ रुग्णांवर उपचार झाले, तर आंतररुग्ण विभागात हीच संखया १ लाख ३ हजार २२३ इतकी होती. दोन्ही विभाग मिळून ५ लाख ९६ हजार ३०६ रुग्णांवर उपचार झाले. २०१७ या वर्षात सर्वाधिक २ लाख ५१ हजार ९२७ रुग्णांवर उपचार करण्यात आले.

 

टॅग्स :Daga Hospitalडागा हॉस्पिटलDeathमृत्यू