२०.४९ क ोटींचे फेरबदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2016 03:31 IST2016-02-11T03:31:53+5:302016-02-11T03:31:53+5:30
स्थायी समितीच्या २०१५-१६ या वर्षाच्या अर्थसंकल्पाला ४८९.९९ कोटींची कात्री लावत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी ..

२०.४९ क ोटींचे फेरबदल
आयुक्तांचा अर्थसंकल्प : सभागृहाची मंजुरी, मार्चपूर्वी सादर करण्याचे संकेत
नागपूर : स्थायी समितीच्या २०१५-१६ या वर्षाच्या अर्थसंकल्पाला ४८९.९९ कोटींची कात्री लावत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीला १४७४.९२ कोटींचा सुधारित अर्थसंकल्प सादर केला होता. यात स्थायी समितीने सूचविलेल्या २०.४९ कोटींच्या फेरबदलाला महापालिकेच्या विशेष सभेत बुधवारी एकमताने मंजुरी देण्यात आली.
आयुक्ताच्या सुधारित अर्थसंकल्पातील एकूण रकमेत कोणत्याही स्वरूपाचा बदल करण्यात आलेला नाही. परंतु आयुक्तांच्या अर्थसंकल्पात भांडवली खर्च २६०.४५ कोटी दर्शविण्यात आला होता. तो स्थायी समितीने कमी करून २३९.९६ क ोटी केला आहे.
यात स्थायी समितीने २०.४९ कोटींची कपात केली आहे. आयुक्तांनी महसुली खर्च १७८.०४ कोटी दर्शविला होता. स्थायी समितीने १९८.५३ क ोटी केला आहे. यात २०.४९ कोटींचा फरक आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी फेरफार व वाढ व दुरस्तीसह सुधारित अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. परिवहन समितीचे सभापती सुधीर राऊ त व सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांनी अनुमोदन दिले. यावर चर्चा करण्यासाठी दोन दिवसाची वेळ द्या. वाटत असेल तर यावर दोन दिवसांनी मुद्देसूद चर्चा करू अशी सूचना विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी केली.
आयुक्तांच्या संपूर्ण अर्थसंकल्पात कोणत्याही स्वरुपाचे बदल करण्यात आलेले नाही.
शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या काही शीर्षकात बदल करण्यात आल्याचे तिवारी यांनी निदर्शनास आणले. महापौर प्रवीण दटके यांनी यावर चर्चा न करता सर्वसंमतीने फेरबदलाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)