शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

लॉकडाऊनमध्ये २ हजार टन पार्सल वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 18:07 IST

लॉकडाऊनदरम्यान मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने विशेष पार्सल रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून २ हजार टन पार्सलची वाहतूक केली आहे. पार्सल रेल्वेगाड्यांना प्रतिसाद मिळावा यासाठी नागपूर विभागाने विविध औद्योगिक संस्था, व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांना मालवाहतुकीसाठी प्रेरित केले आहे.

ठळक मुद्देमध्य रेल्वेच्या नागपूर विभागाची कामगिरी : विविध विभागांशी साधला संपर्क

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनदरम्यान मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने विशेष पार्सल रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून २ हजार टन पार्सलची वाहतूक केली आहे. पार्सल रेल्वेगाड्यांना प्रतिसाद मिळावा यासाठी नागपूर विभागाने विविध औद्योगिक संस्था, व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांनामालवाहतुकीसाठी प्रेरित केले आहे.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या नेतृत्वात वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, सहायक वाणिज्य व्यवस्थापक विजय थूल, एस. जी. राव यांच्या निरीक्षणाखाली अधिकाधिक पार्सलची वाहतूक करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी ऑनलाईन बैठक घेऊन स्टॉक होल्डर्स, ट्रेडर्स, व्यापारी, कृषी संस्था, चेंबर ऑफ कॉमर्स, औद्योगिक संस्थांसोबत संपर्क साधला. पार्सल सेवेबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी स्थानिक नेते, रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांची मदत घेण्यात आली. विशेष पार्सल रेल्वेगाड्यांची माहिती विविध प्रसार माध्यमांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. ग्राहकांच्या आवश्यकतेसाठी पार्सल ट्रॅफिक टास्क फोर्सचे गठन करण्यात आले. त्यामुळे लॉकडाऊनदरम्यान नागपूर विभागातून ११४२ टन पार्सल वाहतूक, गोधनी ते न्यू तिनसुखिया येथे ८९६ टन पार्सलची वाहतूक करण्यात आली. यामुळे नागपूर विभागाला ६३.३६ लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले.आठ विशेष पार्सल रेल्वेगाड्यांचा विस्तारमध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी ३ मेपर्यंत विशेष पार्सल रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु रेल्वेत लॉकडाऊन वाढल्यामुळे आठ विशेष पार्सल रेल्वेगाड्यांचा विस्तार करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.कोरोनामुळे रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे सर्व प्रवासी रेल्वेगाड्या ठप्प झाल्या आहेत. परंतु जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी रेल्वे प्रशासनाने मालगाड्या, विशेष पार्सल रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ३ मेपर्यंत विशेष पार्सल रेल्वेगाड्या, मालगाड्यांची वाहतूक सुरू होती. परंतु रेल्वेत पुन्हा १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आठ विशेष पार्सल रेल्वेगाड्यांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ००१०९ मुंबई-नागपूर विशेष पार्सल रेल्वेगाडी १५ मेपर्यंत, रेल्वेगाडी क्रमांक ००११० नागपूर-मुंबई विशेष पार्सल रेल्वेगाडी १५ मेपर्यंत, रेल्वेगाडी क्रमांक ००११३ मुंबई-शालिमार विशेष पार्सल रेल्वेगाडी १५ मेपर्यंत, रेल्वेगाडी क्रमांक ००११४ शालिमार-मुंबई विशेष पार्सल रेल्वेगाडी १७ मेपर्यंत, रेल्वेगाडी क्रमांक ००६०७ बंगळुरू-गोरखपूर विशेष पार्सल रेल्वेगाडी १० मेपर्यंत आणि रेल्वेगाडी क्रमांक ००६०८ गोरखपूर-बंगळुरू विशेष पार्सल रेल्वेगाडी १३ मेपर्यंत चालविण्यात येणार आहे. तर रेल्वेगाडी क्रमांक ००६२१ बंगळुरू-हजरत निजामुद्दीन विशेष पार्सल रेल्वेगाडी ७ मेपर्यंत तसेच रेल्वेगाडी क्रमांक ००६२२ निजामुद्दीन-बंगळुरू विशेष पार्सल रेल्वेगाडी ९ मेपर्यंत चालविण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे