महिन्याला २०० किलो ब्लिचिंगचा उपयोग
By Admin | Updated: October 9, 2014 01:05 IST2014-10-09T01:05:00+5:302014-10-09T01:05:00+5:30
पाण्याचा स्रोत नसल्याने अखेर ग्रामपंचायतला ब्लिचिंग पावडर टाकून गावाला पाणीपुरवठा करावा लागतो. यामुळे ग्रामपंचायतचे बजेट बिघडते. पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दरमहा

महिन्याला २०० किलो ब्लिचिंगचा उपयोग
नागपूर : पाण्याचा स्रोत नसल्याने अखेर ग्रामपंचायतला ब्लिचिंग पावडर टाकून गावाला पाणीपुरवठा करावा लागतो. यामुळे ग्रामपंचायतचे बजेट बिघडते. पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दरमहा २०० किलो ब्लिचिंग पावडरचा अतिरिक्त खर्च वहन करावा लागतो.
काय म्हणतात
गावकरी ...
पेयजल सर्वात
मोठी समस्या
पेयजल ही बुटीबोरी गावाची सर्वात मोठी समस्या आहे. पाण्याला दुर्गंधी येते. गेल्या ७ वर्षांपासून फिल्टर प्रकल्पाचे काम सुरू आहे. ते अजूनही अपूर्ण आहे.
- मोहसीन शेख, विद्यार्थी.
दुरून आणावे लागते पाणी
पिण्याचे पाणी औद्योगिक क्षेत्रातून आणावे लागते. नळाला येणाऱ्या पाण्याने पांढरे कपडे पिवळे पडतात. त्यामुळे या पाण्याने कपडे धुता येत नाहीत.
- शेरूभाई सुल्डा,
व्यवसायी
काय म्हणतात पदाधिकारी ...
पाणी पिण्यास
अयोग्य
पाणी पिण्यास योग्य नाही, ही बाब आम्ही स्वीकारतो. लॅबमध्ये परीक्षण केल्यानंतर अहवालही तसाच आला. फिल्टर प्रकल्पाला मान्यता मिळाली तेव्हा गुंतवणूक ४ कोटी रुपयांची होती. महागाईनंतर प्रकल्पाची किंमत ७ कोटी ३४ लाख रुपयांवर गेली. यापैकी ३ कोटी रुपये मिळाले आहे. दोन वर्षांपासून काम सुरू आहे. निधी मिळाल्यानंतरच कामाला गती मिळेल.
- अविनाश गुर्जर, अध्यक्ष, पेयजल पुरवठा, बुटीबोरी ग्रामपंचायत.
प्रयत्न सुरू आहेत
पिण्याच्या पाण्याची समस्या अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ आहे. आमचा प्रयत्न सुरू आहे, पण निधीअभावी फिल्टर प्रकल्पाचे काम अधांतरी आहे. सध्या ब्लिचिंग पावडरचा वापर करून पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.
-वंदना रमेश ठाकरे,
सरपंच, बुटीबोरी.