२०० ब्रास रेतीसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:11 IST2021-03-04T04:11:50+5:302021-03-04T04:11:50+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : महसूल विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. २) दुपारी १ वाजताच्या सुमारास गाेसेवाडी शिवारात कारवाई करीत ...

२०० ब्रास रेतीसाठा जप्त
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : महसूल विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. २) दुपारी १ वाजताच्या सुमारास गाेसेवाडी शिवारात कारवाई करीत २०० ब्रास रेतीसाठा जप्त केला. ती रेती कन्हान नदीतील असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. ही या शिवारात कुणी साठवून ठेवली हाेती, याचा अधिकारी शाेध घेत आहेत. ही रेती सावनेर पाेलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाटणसावंगी (ता. सावनेर) पाेलीस चाैकीच्या आवारात जमा करण्यात आली आहे.
सावनेरचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, प्रभारी तहसीलदार चैताली दराडे यांच्या नेतृत्वातील पथकाने मंगळवारी दुपारी कन्हान नदीवरील गाेसेवाडी (ता. सावनेर) रेतीघाटाची पाहणी केली. ही पाहणी करताना त्यांना नदीच्या तीरावरील झुडपांमध्ये रेतीसाठा आढळून आला. त्यामुळे खापा येथील मंडळ अधिकारी हाेमेश्वर पवार, वाकीचे तलाठी मनोज रामटेके, काेतवाल शरद वाकोडे व पाेलीस पाटील पद्माकर मुंडे यांनी पंचनामा करून या रेतीसाठ्याचे माेजमाप केले.
ती रेती २०० ब्रास असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरक्षितेच्या दृष्टीने ती रेती गाेसेवाडी शिवारातून लगेच हलवण्यात आली असून, ती सध्या पाटणसावंगी पाेलीस चाैकीच्या आवारात ठेवली आहे. यासंदर्भात पुढील कारवाई तहसीलदारांच्या आदेशान्वये केली जाणार असल्याचेही महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात महसूल विभागातील अधिकारी नेमकी कुणावर काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे. हा रेतीसाठा पाेलिसांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आला असला तरी महसूल विभागातील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी अद्याप पाेलिसांत तक्रार नाेंदविली नाही.
...
केवळ दाेन लाख रुपये किमत
या २०० ब्रास रेतीसाठ्याची किंमत दाेन लाख रुपये आकारण्यात आल्याची माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. खुल्या बाजारात कन्हान नदीतील तांबडी रेती तीन ते चार हजार रुपये प्रति ब्रासप्रमाणे विकली जाते. महसूल अथवा पाेलीस कर्मचाऱ्यांनी विना राॅयल्टी रेती वाहतुकीचे ट्रक पकडल्यास त्या रेतीची किंमत किमान २,५०० रुपये प्रति ब्रास आकारली जाते. या रेतीची किंमत मात्र एक हजार रुपये प्रति ब्रास आकारली आहे.