२० हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:09 IST2021-03-20T04:09:10+5:302021-03-20T04:09:10+5:30
कन्हान : जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कन्हान (ता. पारशिवनी) शहरात तीन दिवसांपासून दंडात्मक कारवाई केली ...

२० हजारांचा दंड वसूल
कन्हान : जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कन्हान (ता. पारशिवनी) शहरात तीन दिवसांपासून दंडात्मक कारवाई केली जात आहे. या तीन दिवसांत २० हजार ८०० रुपयांचा दंड ठाेठावण्यात आला असून, ताे वसूल केल्याची माहिती कन्हानचे ठाणेदार अरुण त्रिपाठी यांनी दिली.
ही माेहीम नगर परिषद प्रशासन व पाेलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविली जात आहे. शहरात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असूनही नागरिक वारंवार आवाहन करूनसुध्दा प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे पालन करीत नाही. त्यामुळे ही माेहीम सुरू करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी (दि. १९) शहरात मास्क न वापरता फिरणाऱ्या ३२ जणांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून ६४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सलग तीन दिवसांत ८४ जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून २०,८०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती ठाणेदार अरुण त्रिपाठी यांनी दिली. या माेहिमेत ठाणेदार अरुण त्रिपाठी, राजेंद्र गौतम, शरद गिते, सतीश तांदळे यांच्यासह अन्य पालिका व पाेलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही माेहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.