२० लाखांची सुपारी जप्त

By Admin | Updated: May 12, 2017 02:53 IST2017-05-12T02:53:36+5:302017-05-12T02:53:36+5:30

दिल्लीला पाठविण्यासाठी ट्रकमध्ये भरलेली २० लाख ५१ हजारांच्या सुपारीची परस्पर विल्हेवाट लावू पाहणाऱ्या टोळीतील

20 lakhs betel worth seized | २० लाखांची सुपारी जप्त

२० लाखांची सुपारी जप्त

दिल्लीला पाठविण्यासाठी दिलेली सुपारी कामठीत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिल्लीला पाठविण्यासाठी ट्रकमध्ये भरलेली २० लाख ५१ हजारांच्या सुपारीची परस्पर विल्हेवाट लावू पाहणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना लकडगंज पोलिसांनी अटक केली. त्यांच्या काही साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
अनुप महेशचंद्र नागरिया (वय ४४, रा. सूर्यनगर) हे वाहतूक व्यावसायिक असून, त्यांच्याकडे यापूर्वी मुकेशकुमार नावाचा ट्रकचालक होता. त्याच्यामार्फत नागरिया लाखोंचा माल ट्रकमध्ये भरून इकडून तिकडे पाठवीत होते. २ मे रोजी अशाच प्रकारे नागरिया यांनी ३२३ पोत्यांमध्ये भरलेली २१ टन सुपारी ट्रकमध्ये भरून ती दिल्ली येथे नेण्यास सांगितले होते. त्यानुसार आरोपी मुकेशकुमार २० लाख ५१ हजारांचा सुपारीचा माल घेऊन नागपुरातून निघाला, मात्र, ९ मेपर्यंत तो दिल्लीत पोहोचलाच नाही.
त्यामुळे आरोपीने मुकेशकुमार आणि त्याच्या हरियाणातील ट्रक मालकाकडे संपर्क केला असता त्यांचे मोबाईल बंद होते.

काही गुन्हेगार हरियाणात
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी या गुन्ह्याशी संबंधित आरोपी मुकेशकुमार आणि त्याचे अन्य साथीदार हरियाणात राहत असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांचे एक पथक हरियाणाकडे रवाना करण्यात आले. परिमंडळ ३ चे उपायुक्त राहुल माकणीकर, सहायक आयुक्त रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली लकडगंजचे ठाणेदार सत्यवान माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.

 

Web Title: 20 lakhs betel worth seized