धीरज ढोले। लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (काटोल) : नागपूर जिल्ह्यातील काटोल व नरखेड तालुका दर्जेदार ‘नागपुरी संत्रा’च्या उत्पादनासाठी एकेकाळी प्रसिद्ध होता. तांत्रिक कारणांमुळे संत्र्याच्या बागा उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झाली. त्यातच काहींनी संत्र्याला पर्याय म्हणून मोसंबीची निवड केली. मात्र, वंडली (ता. काटोल) येथील रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी डाळिंबाची निवड केली. उत्पादनखर्चाच्या तुलनेत डाळिंबाला बाजारात मिळणारा भाव कमी असल्याने ते आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी त्यांच्या २० एकराची डाळिंबाची झाडे उपटून काढली आणि पेटवून दिली.वाढते तापमान, भूगर्भातील खोलवर गेलेली पाण्याची पातळी, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आणि शासनाची अनास्था यामुळे ‘नागपुरी संत्रा’च्या काटोल व नरखेड तालुक्यातील बागांना उतरती कळा आली. काहींनी संत्र्याला पर्याय म्हणून मोसंबीची निवड केली. मात्र, रामराव महाराज ढोक यांनी मोसंबीऐवजी डाळिंबाची निवड केली.त्यांनी दोन वर्षांपूर्वी तब्बल २० एकरात डाळिंबाच्या कलमांची लागवड केली. या जातिवंत कलमा खानदेशातील जळगाव येथून खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. यात त्यांनी एकरी ४७५ कलमांची लागवड केली होती. या कलमांना दीड वर्षानंतर फलधारणा होत असून, डाळिंब किमान ७० ते ८० रुपये प्रति किलोप्रमाणे विकले जात असल्याने वर्षाकाठी लाखो रुपयांचे उत्पन्न होत असल्याचे सांगण्यात आल्याने आपण डाळिंब लागवडीचा निर्णय घेतल्याचे रामराव ढोक यांनी सांगितले.वास्तवात, उत्पादनखर्च अधिक आणि त्याला बाजारात मिळणारा भाव अत्यल्प असल्याने डाळिंबाचे उत्पादन परवडण्याजोगे नाही. शिवाय, रोग व किडींपासून वाचविण्यासाठी झाडांवर महागड्या कीटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी करावी लागत आल्याने उत्पादनखर्च वाढतो. ही बाब परवडण्याजोगी नसल्याने आपण ही बाग उपटून शेत साफ केल्याचे त्यांनी सांगितले.एकरी अडीच लाख रुपये खर्चडाळिंबाचा एकरी उत्पादनखर्च दोन ते अडीच लाख रुपये आहे. बाजारातील डाळिंबाचे किरकोळ भाव किमान ८० रुपये प्रति किलो असले तरी तेच डाळिंब शेतकऱ्यां
२० एकरातील डाळिंबाची बाग उपटून जाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 20:19 IST
नागपूर जिल्ह्यातील काटोल व नरखेड तालुका दर्जेदार ‘नागपुरी संत्रा’च्या उत्पादनासाठी एकेकाळी प्रसिद्ध होता. तांत्रिक कारणांमुळे संत्र्याच्या बागा उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झाली. त्यातच काहींनी संत्र्याला पर्याय म्हणून मोसंबीची निवड केली. मात्र, वंडली (ता. काटोल) येथील रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी डाळिंबाची निवड केली. उत्पादनखर्चाच्या तुलनेत डाळिंबाला बाजारात मिळणारा भाव कमी असल्याने ते आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी त्यांच्या २० एकराची डाळिंबाची झाडे उपटून काढली आणि पेटवून दिली.
२० एकरातील डाळिंबाची बाग उपटून जाळली
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील शेतकऱ्याचा असाही संतापसंत्र्यापाठोपाठ डाळिंबानेही दिला दगाउत्पादनखर्च भरून निघेना