शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

२ रु. रोजंदारी मजूर ते २००० कोटींची मालक ; कल्पना सरोज यांचा थक्क करणारा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 1:34 AM

आत्महत्या करण्याचा विचार मनात आला तर एकदा मुंबईतील उद्योजिका कल्पना सरोज यांना भेटा, असा उल्लेख देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. पंतप्रधानांनी असे का म्हटले असावे, याचा उलगडा शनिवारी जागतिक मराठी संमेलनाच्या मंचावर स्वत: पद्मश्री कल्पना सरोज यांच्याकडूनच झाला. अत्यंत खडतर प्रवास करताना केवळ २ रुपये रोजीने शिवणकाम करणारी ही महिला २००० कोटींच्या व्यवसायाची मालकीण होते, हा प्रवास खरं तर रोमांचक आणि अंतर्मुख करणाराही आहे.

ठळक मुद्देविदर्भाच्या लेकीची प्रेरणादायी गाथा

 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आत्महत्या करण्याचा विचार मनात आला तर एकदा मुंबईतील उद्योजिका कल्पना सरोज यांना भेटा, असा उल्लेख देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. पंतप्रधानांनी असे का म्हटले असावे, याचा उलगडा शनिवारी जागतिक मराठी संमेलनाच्या मंचावर स्वत: पद्मश्री कल्पना सरोज यांच्याकडूनच झाला. अत्यंत खडतर प्रवास करताना केवळ २ रुपये रोजीने शिवणकाम करणारी ही महिला २००० कोटींच्या व्यवसायाची मालकीण होते, हा प्रवास खरं तर रोमांचक आणि अंतर्मुख करणाराही आहे.वनामतीच्या सभागृहात १६ व्या जागतिक मराठी संमेलनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे उपकुलसचिव अनिल हिरेखण व सचिन ईटकर यांनी कल्पना सरोज यांची मुलाखत घेतली. अकोल्याजवळच्या रेपाडखेडा या गावातील कल्पना. पोलीस गर्ल असलेल्या कल्पना यांच्या जीवनातील संघर्षाचा प्रवास वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षापासून सुरू झाला. जेमतेम सातव्या वर्गात असताना कल्पना यांचे लग्न झाले. तिला शिकायचे होते, पण ते मिळाले नाही. लग्नानंतर सुखाचे जीवन मिळेल, ही आशाही थोड्याच महिन्यात मावळली. मुंबईच्या झोपडपट्टीत राहताना सासरच्यांकडून अतोनात छळ सहन करावा लागला. त्यामुळे एक दिवस वडिलांनी तिला परत आणले. ८० च्या दशकातील तो काळ. लोकांचे बोलणे असह्य करणारे. एकेदिवशी आत्महत्या करण्याचा प्रयत्नच तिने केला. पण यावेळीही सहानुभूतीऐवजी लोकांचे संशयकारक बोलणेच तिला ऐकावे लागले. मात्र या एका प्रसंगाने तिला कणखर बनविले. दहावीपर्यंत शिक्षण करून पोलीस, सैन्य किंवा नर्सिंग अशा ठिकाणी नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला, पण अपयश हाती आले. त्यामुळे निर्धार करून तिने अकोला सोडले आणि पुन्हा मुंबई गाठली. मात्र सासरला न जाता दुसऱ्या एका झोपडपट्टीत ओळखीच्यांच्या आधाराने राहू लागली. एक दिवस त्यांच्यासोबत राहणारी लहान बहीण औषधाविना मरण पावल्याची दु:खद आठवणही त्यांनी नमूद केली.शिवणकाम शिकले होते. त्याच आधारावर तिने एका कंपनीत २ रुपये रोजीने नोकरी मिळविली. निराशा झटकून वेगाने काम सुरू केले तेव्हा पगाराचे २२५ रुपये तिला मिळाले. पहिल्यांदा १०० रुपयाची नोट पाहिल्याचा उल्लेख त्यांनी केला. हे करताना स्वत:चा शिवणकामाचा व्यवसाय सुरू करून वस्तीतील गरजू महिलांना रोजगार देण्याचा विचार करीत ५० हजार रुपये कर्ज काढले आणि व्यवसाय सुरू केला.वस्तीतील महिलांचे प्रेम आणि ज्यांच्याकडे त्यांचे कपडे जायचे त्या मोठ्या उद्योजकांचा विश्वासही वाढत होता.अशातच एक दिवस डबघाईस गेलेल्या कमानी ट्यूब कंपनीच्या ९३ कामगारांनी ही कंपनी टेकओव्हर करण्याची विनंती केली. न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कंपनी कामगारच चालवीत होते. ११६ कोटींचे कर्ज, १४० पेक्षा जास्त न्यायालयीन खटले सुरू असलेली ही कंपनी कशी घ्यायची, हा प्रश्नच होता. पण कंपनीच्या दुरवस्थेमुळे कामगारांची दैनावस्था झाली होती व त्यांच्या कुटुंबाचे हालहाल झालेले त्यांनी पाहिले आणि केवळ कामगारांचा विचार करून त्यांनी कंपनी घेण्याचा निर्धार केला. पुढे राज्याच्या तत्कालीन अर्थमंत्र्यांना भेटून कंपनीच्या कर्जाचे व्याज आणि दंड माफ करण्याची विनंती केली. त्यांनीही ती मान्य करीत मूळ कर्जातही सूट देऊ केली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. पुढचा एकेक टप्पा गाठत आज कल्पना सरोज यांनी उद्योग क्षेत्रात मोठे स्थान निर्माण केले आहे. २०१३ साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने त्यांचा गौरव केला.त्यांच्या शब्दानुसार स्वत:मधील आत्मविश्वास शोधून प्रामाणिकपणा व १०० टक्के कष्ट घेण्याची तयारी असेल तर कोणतेही शिखर गाठता येते. एक मात्र खरे समाजात जसे वाईट लोक असतात तसे चांगलेही असतात. तुमच्यातील चांगलेपणामुळे ते नक्की जवळ येतात. अशा मदत करणाऱ्या, धावून येणाऱ्या व भक्कमपणे पाठीशी उभे राहिलेल्या लोकांमुळे यश मिळू शकल्याची कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.हत्येचाही झाला प्रयत्नशिवणकामाचा व्यवसाय सुरू केल्यानंतर एका गरजू माणसाच्या विनंतीवरून त्याची जागा विकत घेतली. मात्र ही जागा सिलिंगमध्ये असून वादग्रस्त असल्याचे नंतर कळले. त्यांनी प्रयत्न करून या जागेचा ताबा मिळविला व आपल्या कंपनीसाठी बांधकाम सुरू केले. मात्र स्थानिक गुंडांचा यास विरोध होता. त्यावेळी पाच लाखात त्यांच्या हत्येची सुपारी दिली. मात्र हत्येसाठी पाठविलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला कधीतरी मदत केली होती. त्यामुळे त्यानेच सूचना केली, पण धोका असल्याने मुंबई सोडून जाण्याची विनंतीही केली. मात्र माघार न घेता ठाण्याच्या पोलीस आयुक्तांची मदत घेतल्याचे त्यांनी सांगितले.युनोमध्ये साजरी केली बाबासाहेबांची जयंतीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती असताना ती युनोमध्ये साजरी करण्याचा विचार मनात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ती तात्काळ मंजूर केली आणि अमेरिकेच्या टाइम्स चौकापासून युनोपर्यंत मिरवणूक काढून उत्साहात त्यांची जयंती साजरी केल्याचे त्यांनी सांगितले. लंडनमधील बाबासाहेबांचे वास्तव्य असलेले घर घेण्यातही सरोज यांनी पुढाकार घेतला होता. त्यावेळी मोदी यांनी क्षणात मदत जाहीर केल्याचे त्यांनी नमूद केले.

 

 

टॅग्स :marathiमराठीinterviewमुलाखत