बचत गटाच्या १.९७ लाख रुपयांची अफरातफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:09 AM2021-03-05T04:09:49+5:302021-03-05T04:09:49+5:30

माैदा : महिला बचत गटाच्या अध्यक्षाने १ लाख ९७ हजार रुपयांची अफरातफर केली. ही घटना माैदा शहरात नुकतीच घडली. ...

1.97 lakh scam of self-help group | बचत गटाच्या १.९७ लाख रुपयांची अफरातफर

बचत गटाच्या १.९७ लाख रुपयांची अफरातफर

Next

माैदा : महिला बचत गटाच्या अध्यक्षाने १ लाख ९७ हजार रुपयांची अफरातफर केली. ही घटना माैदा शहरात नुकतीच घडली.

माैदा शहरात स्पंदन महिला बचत गट आहे. या बचत गटाच्या अध्यक्षा गटातील सदस्यांकडून रक्कम गाेळा करणे, ती रक्कम बँकेत बचत गटाच्या खात्यात जमा करणे, बँकेकडून कर्ज घेणे, गटातील महिला सदस्यांना कर्ज देणे, ते वसूल करणे, हिशेब ठेवणे यासह अन्य कामे करायच्या. काही महिला सदस्यांनी बचत गटाकडून कर्ज घेतले हाेते. अध्यक्षाने त्या कर्जाची वसुली केली. ती रक्कम गटाच्या बँक खात्यात जमा न करता स्वत: वापरली. शिवाय, गटातील सदस्यांना विश्वासात न घेता, आयसीआयसीआय बँकेकडून ३० हजार रुपयांच्या कर्जाची परस्पर उचलही केली. ही बाब लक्षात येताच ललिता विनाेद निकाेडे, रा. भाेयर काॅलेजजवळ, माैदा यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली. अध्यक्षाने बचत गटाच्या १ लाख ९७ हजार रुपयांची अफरातफर केल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी भादिवं ४२०, २०९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास पाेलीस हवालदार कुथे करीत आहेत. वृत्त लिहिस्ताेवर आराेपी अध्यक्षाला अटक करण्यात आली नव्हती.

Web Title: 1.97 lakh scam of self-help group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.