मास्क न वापरणाऱ्या १९५ नागरिकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:13 IST2021-02-23T04:13:53+5:302021-02-23T04:13:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वाढता कोविड संसर्ग विचारात घेता, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी मास्कचा वापर न करणाऱ्यांवर ...

195 citizens fined for not wearing masks | मास्क न वापरणाऱ्या १९५ नागरिकांना दंड

मास्क न वापरणाऱ्या १९५ नागरिकांना दंड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वाढता कोविड संसर्ग विचारात घेता, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, मनपाच्या उपद्रव शोध पथकामार्फत दररोज कारवाई केली जात आहे. सोमवारी १९५ लोकांवर कारवाई करून, त्यांच्याकडून ९७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्कही देण्यात आले. पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात मागील काही महिन्यांत शोध पथकांनी ३३,३२५ नागरिकांविरुद्ध कारवाई करून आतापर्यंत १ कोटी ५० लाख २१ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.

सोमवारी मनपा उपद्रव शोध पथकाद्वारे लक्ष्मीनगर झोनअंतर्गत २७, धरमपेठ २७, हनुमाननगर २२, धंतोली ५, नेहरूनगर २५, गांधीबाग १६, सतरंजीपुरा ७, लकडगंज १२, आशीनगर २५, मंगळवारी २६ आणि मनपा मुख्यालयातील ३ जणांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. ५०० रुपयांप्रमाणे आतापर्यंत २७,८५५ नागरिकांकडून १ कोटी ३९ लाख २७ हजार ५०० रुपये वसूल करण्यात आले आहेत.

Web Title: 195 citizens fined for not wearing masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.