शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

विदर्भातील १९.३९ लाख शेतकरी मदतीसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 12:00 IST

राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे २ हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. त्यासाठी विदर्भातल्या ११ जिल्ह्यातील १९ लाख ३९ हजार ७६२ शेतकरी पात्र ठरले आहेत.

ठळक मुद्दे१३६२ कोटींचा प्रस्तावबोंडअळी आणि मावा-तुडतुड्यामुळे नुकसान

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षी पावसाची कमतरता आणि ढगाळ वातावरणामुळे कापूस आणि धानवर आलेल्या रोगराईने विदर्भातील कापूस व धान उत्पादकांना मोठा फटका बसला. राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे २ हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. त्यासाठी विदर्भातल्या ११ जिल्ह्यातील १९ लाख ३९ हजार ७६२ शेतकरी पात्र ठरले आहेत. शासकीय निकषाप्रमाणे त्यांना १३६२ कोटी १० लाख रुपयांची मदत मिळणार आहे. मात्र त्यावर मंत्रालयातून अद्याप अंतिम निर्णय होऊन मदतनिधी देण्यात आलेला नाही.राज्य शासनाच्या जीआरनुसार ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान असणाऱ्या शेतकऱ्यांना जिरायती शेतीसाठी हेक्टरी ६८०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) तर बागायती शेतीसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) अशी मदत मिळणार आहे. त्यामुळे मदतीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना प्रतिशेतकरी किमान ६८०० ते जास्तीत जास्त २७ हजार एवढी मदत मिळणार आहे. ७ डिसेंबरला राज्य शासनाने काढलेल्या आदेशानुसार कापूस व धानपिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले.त्यात नागपूर विभागातील ६ जिल्ह्यातील ९ लाख ३८ हजार ११५ शेतकरी मदतीपासून पात्र ठरले आहेत. त्यांना ८१७ कोटी ३ लाख ७९ हजार रुपयांची मदत मिळणार आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात १० लाख १ हजार ६४७ शेतकरी शासकीय मदतीसाठी पात्र ठरले असून त्यांना ५४५ कोटी ७ लाख रुपयांची मदत मिळणार आहे.

प्रत्यक्ष मदतीसाठी निधीच नाहीप्रशासकीय यंत्रणेने शेतीचे सर्व्हेक्षण करून मदतीसाठी पात्र ठरलेले शेतकरी व त्यांच्या संभाव्य मदतीचा आकडा शासनाकडे पाठविला आहे. मात्र ही मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार हे गुलदस्त्यात आहे. कर्जमाफीमुळे मेटाकुटीत आलेल्या सरकारला ही मदत देताना आणखी तिजोरी रिकामी करावी लागणार आहे. त्यामुळे या मदतीसाठी शेतकऱ्यांना काही महिने तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कापूस उत्पादकांची संख्या तिप्पटपश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात धानाचे उत्पादन घेतले जात नाही. मात्र पूर्व विदर्भात वर्धा वगळता इतर पाच जिल्ह्यात धानासोबत कापसाचेही उत्पादन घेतले जाते. नुकसानभरपाईसाठी केवळ धान उत्पादन घेणारे ५ लाख २३ हजार २१० शेतकरी पात्र झाले आहेत. त्यांना २२७ कोटी ४६ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. त्यांच्या तुलनेत मदतीसाठी पात्र ठरलेले कापूस उत्पादक शेतकरी १४ लाख १६ हजार ५५२ आहेत. त्यांना ११३४ कोटी ६४ लाख रुपयांची मदत मिळेल.

टॅग्स :Farmerशेतकरी