महिलांच्या कोचमधील १९ प्रवाशांना तुरुंगवास

By Admin | Updated: February 19, 2015 01:54 IST2015-02-19T01:54:31+5:302015-02-19T01:54:31+5:30

गोंडवाना एक्स्प्रेसमध्ये महिलांसाठी राखीव कोचमधून प्रवास करणाऱ्या १९ प्रवाशांच्या चांगलेच अंगलट आले.

19 women in women's coaches imprisoned | महिलांच्या कोचमधील १९ प्रवाशांना तुरुंगवास

महिलांच्या कोचमधील १९ प्रवाशांना तुरुंगवास

नागपूर : गोंडवाना एक्स्प्रेसमध्ये महिलांसाठी राखीव कोचमधून प्रवास करणाऱ्या १९ प्रवाशांच्या चांगलेच अंगलट आले. रेल्वे सुरक्षा दलाने त्यांना पकडून रेल्वे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड सुनावला. दंड भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे सर्वांना २५ फेब्रुवारीपर्यत तुरुंगात रवाना करण्यात आले.
रेल्वे अ‍ॅक्ट १६२ नुसार महिलांसाठी राखीव कोचमधून पुरुष प्रवाशांनी प्रवास करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. परंतु अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करून महिलांसाठी राखीव कोचमधून प्रवास करतात. बुधवारी सकाळी रेल्वेगाडी क्रमांक १२७२१ हैदराबाद-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेसच्या महिलांसाठी राखीव कोचमध्ये १९ पुरुष प्रवासी प्रवास करीत होते. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना पकडून रेल्वे न्यायालयात हजर केले. प्रवाशांमध्ये पप्पू शहा (२६) रा. फटीयाबाजार गोपालगंज, सरवन नव्वदे दास (२४) समस्तीपूर उत्तरप्रदेश, अजय गुप्ता (२२) बिहार वजगर कृषीनगर उत्तरप्रदेश, अरविंद रामबहादुर पासवान (२०) समध पांडे टोला, गोरखपूर, नरेश घासीटाप्रसाद पटेल (४६) नारा मंडला, भजनलाल मरार बालाघाट, आसाराम मानेधर (४५) बालाघाट, रणजित शर्मा (२२) कृषीनगर उत्तरप्रदेश, दिलीप दुर्गाप्रसाद (१८) रिवा मध्यप्रदेश, अशोक ढेहरीया (२१) कांची खाभाटीया, शिवनी, मिंटु वर्मा (२२) कुशीनगर, चेतन मानकर (१९) वर्धा, रोशन रावत (२०) वर्धा आदींचा समावेश आहे. रेल्वे प्रवाशांना रेल्वे न्यायालयाने प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. परंतु संबंधित प्रवाशांजवळ दंड भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्यांना २५ फेब्रुवारीपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)

Web Title: 19 women in women's coaches imprisoned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.