२७ प्रतिष्ठानांना १.८४ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:08 IST2021-05-27T04:08:12+5:302021-05-27T04:08:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या एनडीएस जवानांनी बुधवारी २७ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १ लाख ८४ हजारांचा दंड वसूल ...

1.84 lakh fine to 27 establishments | २७ प्रतिष्ठानांना १.८४ लाखांचा दंड

२७ प्रतिष्ठानांना १.८४ लाखांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या एनडीएस जवानांनी बुधवारी २७ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १ लाख ८४ हजारांचा दंड वसूल केला. पथकाने ५५ प्रतिष्ठाने व दुकानांची तपासणी केली.

लक्ष्मीनगर झोनअंतर्गत पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजारांचा दंड करण्यात आला. धरमपेठ विभागांतर्गत चार प्रतिष्ठानांची तपासणी करून ३५ हजार, धंतोलीच्या पथकाने तीन दुकानांची तपासणी करून १० हजारांचा दंड वसूल केला. नेहरूनगर येथे १२ प्रतिष्ठानांची तपासणी करून १९ हजार रुपये, गांधीबाग येथे आठ प्रतिष्ठानांची तपासणी करून ४५ हजार रुपये, सतरंजीपुरा येथे दोन प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजार रुपये, आसीनगर पथकाने चार प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजारांचा, तर मंगळवारी झोन पथकाने पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन‌ बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकप्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय शोध पथकांद्वारे ही कारवाई केली जात आहे.

Web Title: 1.84 lakh fine to 27 establishments