१८ तालुके, ९१ पाणलाेट क्षेत्र डार्क झाेनमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST2021-07-18T04:07:04+5:302021-07-18T04:07:04+5:30
तालुकानिहाय वर्गवारी २००८ २०११ ...

१८ तालुके, ९१ पाणलाेट क्षेत्र डार्क झाेनमध्ये
तालुकानिहाय वर्गवारी २००८ २०११ २०१३ २०१७ २०१९
सुरक्षित ३२३ ३२५ ३२४ २७१ २७१
अंशत: शाेषित १९ १६ १९ ६१ ६३
शाेषित २ २ १ ९ ८
अतिशाेषित ९ १० ९ ११ १०
पाणलाेट क्षेत्राची वर्गवारी (एकूण १५३५)
वर्गवारी २००८ २०११ २०१३ २०१७ २०१९
सुरक्षित १३३२ १३४७ १३३८ ११२७ ११५८
अंशत: शाेषित ११९ १०० १११ २९१ २८७
शाेषित ३ ४ ४ ४६ २८
अतिशाेषित ७३ ७६ ७४ ६७ ६३
डार्क झाेनमधील तालुके (नागपूर जिल्ह्यात संत्रा उत्पादक क्षेत्र)
नरखेड (नागपूर), वरुड, माेर्शी, अचलपूर, चांदूरबाजार (अमरावती), जळगाव जामाेद, संग्रामपूर (बुलडाणा), रावेर, यावल (जळगाव), पुरंदर, शिरुर (पुणे), कवठे महांकाळ (सांगली), माळशिरस (साेलापूर) यांच्यासह अहमदनगरचे राहता, राहुरी, संगमनेर, काेपरगाव, श्रीरामपूर, नाशिकचे देवळा, निफाड, सिन्नर आदी तालुक्यांमध्ये भूजलस्तराचा उपसा अधिक आहे.
भूजल मूल्यांकनामुळे भूजल विकासाची व व्यवस्थापनाची दिशा देणारे आहे. भूजलाच्या उपशावर कुठेतरी तांत्रिकदृष्ट्या नियमन व्हावे व घसरत चाललेली दुष्काळी गावांची संख्या व अनिर्बंध बोअरवेलद्वारे होणारा उपसा यावर गरज आहे तिथे नियंत्रण अथवा बंदी करण्याच्या दृष्टीने २००९ साली महाराष्ट्र शासनाने "महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम,२००९ पारित केला. या कायद्याची काटाेकाेर अंमलबजावणी आवश्यक आहे.
- सुनील कडू, वरिष्ठ भूवैज्ञानिक