नगर परिषदेसाठी १८ कोटींचा निधी मंजूर

By Admin | Updated: September 1, 2016 03:12 IST2016-09-01T03:12:10+5:302016-09-01T03:12:10+5:30

जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतीतील विकासकामांसाठी १४ व्या केंद्रीय वित्त आयोगातून १८ कोटी ६ लाख ३३ हजार १८७ रुपये मंजूर करण्यात आले आहे.

18 crores sanctioned for municipal council | नगर परिषदेसाठी १८ कोटींचा निधी मंजूर

नगर परिषदेसाठी १८ कोटींचा निधी मंजूर

१४ वा वित्त आयोग : कामठीला मिळणार सर्वाधिक सव्वातीन कोटी
नागपूर : जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतीतील विकासकामांसाठी १४ व्या केंद्रीय वित्त आयोगातून १८ कोटी ६ लाख ३३ हजार १८७ रुपये मंजूर करण्यात आले आहे. हा निधी वितरित करण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निधी मिळण्याकरिता प्रयत्न केले. या निधीमुळे जिल्ह्यातील नगर पंचायती व नगर परिषदांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
१४ व्या वित्त आयोगातून नागपूर जिल्ह्यातील कामठी नगर परिषदेला ३ कोटी २२ लाख ८७ हजार, रामटेक पालिकेला ८६ लाख ४ हजार ७२०, नरखेडला ८२ लाख २४ हजार ४१०, काटोलला १ कोटी ८२ लाख ९६ हजार ८६०, उमरेडला २ कोटी ७ लाख आठ हजार, सावनेरला १ कोटी २२ लाख ९३ हजार, कळमेश्वरला ८९ लाख ९६ हजार ३८५, मोहप्याला २७ लाख ४६ हजार, मोवाडला ४० लाख ४४ हजार, कन्हानला १ कोटी ८ लाख ८ हजार, वाडीला २ कोटी ४ लाख २६ हजार, खापा नगर परिषदेला ४७ लाख ४९ हजार रुपये मंजूर करण्यात आले.
यासोबतच महादुला नगर पंचायतीला ८२ लाख ९३ हजार, कुही नगर पंचायतीला ४८ लाख ३३ हजार, हिंगणा नगर पंचायतीला ३७ लाख २४ हजार, भिवापूर नगर पंचायतीला ५० लाख २८ हजार निधी मंजूर झाला. जिल्ह्यातील १२ नगर परिषदा आणि पाच नगर पचायतींना १४ व्या वित्त आयोगातून एकूण १८ कोटी ६ लाख ३३ हजार १८७ रुपये विविध विकासकामांसाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे तेथील विकासकामांना आता चालना मिळणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 18 crores sanctioned for municipal council