शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

एनडीसीसीमध्ये अडकले नागपूर जि.प.चे १८ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 22:24 IST

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (एनडीसीसी) जिल्हा परिषद व ग्राम पंचायतीचे १८ कोटी रुपये अटकले असल्याचा मुद्दा जि.प.च्या वित्त समितीच्या बैठकीत सदस्यांनी उचलला. यात जि.प.च्या सेसफंडाचे ११.७८ कोटी तर ग्रा.पं.चे ६ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. यासंदर्भात वित्त सभापती उकेश चव्हाण यांनी पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले आहे.

ठळक मुद्देवित्त समितीच्या बैठकीत सदस्यांनी उचलला मुद्दा : पैशाच्या वसुलीसाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (एनडीसीसी) जिल्हा परिषद व ग्राम पंचायतीचे १८ कोटी रुपये अटकले असल्याचा मुद्दा जि.प.च्या वित्त समितीच्या बैठकीत सदस्यांनी उचलला. यात जि.प.च्या सेसफंडाचे ११.७८ कोटी तर ग्रा.पं.चे ६ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. यासंदर्भात वित्त सभापती उकेश चव्हाण यांनी पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले आहे.पूर्वी एनडीसीसी बँकेला शेतकऱ्यांची व जि.प.च्या कर्मचाऱ्यांची बॅँक म्हणून ओळखले जात होते. सात-आठ वर्षांपूर्वी बँकेच्या आर्थिक व्यवहाराला न्यायालयाने रोक लावली होती. गेल्या दोन-तीन वर्षांपासून बँकेचा व्यवहार परत सुरू झाला आहे. या बँकेत जि.प.च्या सेसफंडाचे ११.७८ कोटी रुपये तर ग्रामपंचायतीचे सहा कोटी रुपये अडकले आहे. जि.प.चा सेसफंड हा ३५ कोटीचा असतो. अशात बँकेत अडकलेले १२ कोटी जर मिळाल्यास ग्रामीण भागातील विकास कामास हातभार लागेल, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली.मुख्यालयाचे ३.३९ कोटीजि.प.नागपूर अंतर्गत मुख्यालय व पंचायत समितीचा सेसफंड व घसारा निधी जो अखर्चित आहे, तो बँकेत अडकला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. यात सर्वाधिक ३.३९ कोटी रुपये मुख्यालयाचे आहे. तर पं.स. नागपूरचे ६७.१५ लाख, हिंगणा ६९.०९ लाख, कामठी ४०.०५ लाख, कळमेश्वर ४३.२१ लाख, काटोल ५१.९७ लाख, नरखेड ५३.८१ लाख, सावनेर ५३.८९ लाख, पारशिवनी ४९.३८ लाख, रामटेक ६४.०४ लाख, मौदा ५२.६० लाख, कुही ३.७३ लाख, उमरेड ६३.४४ लाख, भिवापूर १४.९६ लाख, घसारा निधी २.१२ कोटी रुपयांचा समावेश आहे. त्याचबरोबर पं.स. कळमेश्वर अंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायतीची रक्कम २४.९६ लाख आहे. पारशिवनी ६७.१२ लाख, कुही ५६.०८ लाख, भिवापूर २०.१६ लाख, सावनेर ७३.४३ लाख व नरखेड पं.स. अंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायतीचे ५०.२२ लाख, काटोल ८२.२५ लाख एनडीसीसी मध्ये अडकल्यामुळे अखर्चित आहे. सभापतींनी बँकेत अडकलेल्या रक्कमेची विस्तृत माहिती घेऊन पुढची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले.१४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून निकृष्ट कामबैठकीत सदस्यांनी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून जे काम झाले, ते निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप केला. ही कामे बांधकाम, पाणी पुरवठा व सिंचन विभागांतर्गत येतात. सभापतींनी संबंधित अधिकाऱ्यांची समिती गठित करून तपासणी करण्याचे निर्देश दिले. सोबतच जोपर्यंत काम पूर्ण होणार नाही, तोपर्यंत ठेकेदाराचे बिल थांबवून ठेवण्याचे निर्देश दिले. २०१७-१८ मध्ये १४ व्या वित्त आयोगातून ६४.२४ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. त्यातून केवळ १८.८९ कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूर