१८ वरून ८० कोटी!

By Admin | Updated: November 24, 2015 06:04 IST2015-11-24T06:04:25+5:302015-11-24T06:04:25+5:30

प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे निर्धारित कालावधीत काम पूर्ण न केल्याने महापालिकेच्या सिव्हिल लाईन येथील

18 crore to 80 crore! | १८ वरून ८० कोटी!

१८ वरून ८० कोटी!

नागपूर : प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे निर्धारित कालावधीत काम पूर्ण न केल्याने महापालिकेच्या सिव्हिल लाईन येथील मुख्यालयाच्या नवीन नऊ मजली इमारतीचा खर्च सुरुवातीला १८ कोटी तर आता ५६ कोटीवरून ८० कोटीवर गेला आहे. काम वाढीव मुदतीतही पूर्ण न झाल्यास हा खर्च १०० कोटीवर जाण्याची शक्यता महापालिकेतील काही कंत्राटदारांनी व्यक्त केली आहे.
सल्लागार व कंत्राटदार यांच्या वादात या इमारतीचे काम रखडले. प्रशासनानेही यावर वेळीच तोडगा काढला नाही. नवीन प्रशासकीय छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु अंतर्गत सजावट व फर्निचरची कामे अपूर्णच आहे. त्यामुळे नऊ मजल्याच्या या इमारतीतील दोन मजल्यावर कार्यालये सुरू झाली असून इतर मजले अद्याप रिकामे आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या मजल्यावर २०१२ मध्ये महापालिका आयुक्त, अग्निशमन विभाग, अप्पर आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यालये आली. वरच्या मजल्यावर वित्त विभाग आला. परंतु या मजल्याचे फर्निचरचे काम अद्याप अपूर्ण आहे. २०१३ मध्ये ही इमारत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु दोन मजल्याचेच अंतर्गत काम पूर्ण करण्यात आले आहे. इतर मजल्याचे काम अपूर्ण असल्याने ही इमारत रिकामी पडून आहे.
खर्च १०० कोटीवर जाणार?
४नवीन इमारतीचे काम वेळेत पूर्ण झाले असते तर यावर १८ कोटी खर्च झाले असते. विलंब झाल्याने १८ कोटीचा खर्च ८० कोटीवर गेला आहे. कंत्राटदार सक्रिय नसल्याने व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा खर्च वाढला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता वाढीव मुदतीत काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हा खर्च १०० कोटीवर जाण्याची शक्यता आहे.

Web Title: 18 crore to 80 crore!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.