शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

नागपुरात १८ कोरोनाबाधितांचा मृत्यू; २२१७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 10:12 AM

नागपुरात सोमवारी एकाच दिवशी सर्वाधिक १८ रुग्णांना जीव गमवावा लागला. एका दिवशी कोरोनाने मृत्यू पडणाऱ्यांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.

ठळक मुद्दे२४६ पॉझिटिव्हची भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोना मृत्यूचे थैमान सुरुच आहे. सोमवारी एकाच दिवशी सर्वाधिक १८ रुग्णांना जीव गमवावा लागला. एका दिवशी कोरोनाने मृत्यू पडणाऱ्यांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. आॅगस्टमध्ये सुरुवातीच्या तीन दिवसातच ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच नागपुरातील कोरोना मृत्यूची संख्या १७२ वर पोहोचली आहे. तर सोमवारी २४६ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. नागपुरात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६,१४३ वर पोहोचली असून आतापर्यंत ३,७५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सोमवारी शहरात १८० आणि ग्रामीणमध्ये ६६ नवीन पॉझिटिव्ह आढळून आले. १३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या २,२१७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

मेडिकलमध्ये सोमवारी वानाडोंगरी येथील ६५ वर्षीय महिला, कामठीतील ५० वर्षीय महिला, हिंगण्यातील ५० वर्षीय महिला, सूर्यनगर येथील ७२ वर्षी. पुरुष, धरमपेठ येथील ४९ वर्षीय पुरुष, गरोबा मैदान येथील ४५ वर्षीय पुरुष, भालदारपुरा येथील ६२ वर्षीय महिला आणि टिमकी येथील ६१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मेयो रुग्णालयात दहेगाव येथील ६२ वर्षीय महिला, यशोदानगर येथील ३५ वर्षीय पुरुष, अंसारनगर येथील २८ वर्षीय महिला, जरीपटका येथील ६८ वर्षीय पुरुष आणि दत्तवाडी येथील ५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. यात बहुतांश मृतांना मधुमेह, बीपी, न्युमोनिया यांची समस्या होती. उर्वरित ५ रुग्णांचा मृत्यू कुठे झाला याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून उपलब्ध करण्यात आलेली नाही. सोमवारी ग्रामीणमध्ये ५ आणि नागपूर शहरात १३ मृत्यू झाले.

सोमवारी मेयोच्या प्रयोगशाळेत ६२, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ७७, एम्सच्या प्रयोगशाळेत ४८, माफसूच्या प्रयोगशाळेत १६, खासगी प्रयोगशाळेत १५ आणि अ‍ॅण्टिजेन टेस्टमध्ये २८ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. आज एकूण १७०९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात ८७,३४४ नमुने तपासण्यात आलेले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस