शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात १७० बस चार्जिंग स्टेशन; एसटीकडे ५ हजार इलेक्ट्रिक बसेस येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 05:45 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पाच हजार १५० इलेक्ट्रीक बसेस भाडेतत्वावर घेण्याबाबत संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पाच हजार १५० इलेक्ट्रीक बसेस भाडेतत्वावर घेण्याबाबत संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्रामीण भागात १७० बस चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य शासनातर्फे मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली. या संदर्भात राजेश राठोड व इतर सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

नवीन बस घेण्यासाठी राज्य शासनाकडून अतिरिक्त ७०० कोटी  रुपये महामंडळाला देण्यात आले आहेत. सन २०१६-१७ पासून २०२१-२२ या कालावधीत एसटी महामंडळाने तीन हजार २३४ बसेस घेतल्या आहेत. यात ६१७ बसेस या भाडेतत्त्वावर तर दाेन हजार ६१७ बसेस या मालकी तत्वावर आहेत. राज्याकरिता मोठ्या प्रमाणावर बसेसची आवश्यकता असून नवीन ७०० बसेसची खरेदी अंतिम टप्प्यात असून नव्याने दाेन हजार बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया प्रस्तावित आहे. सातशे बसेसमध्ये ४५० डिझेल बसेस, ५० इलेक्ट्रिक बसेस तर २०० निमआरामदायी बसेसचा समावेश आहे. या ७०० बसेसपैकी १९० बस चेसिस ताब्यात मिळाले असून यावर बॉडीबिल्डिंगचे काम सुरू असल्याची माहिती देसाई यांनी दिली.   

शाळा- विद्यालयांच्या वेळेनुसार वेळापत्रक

ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरी भागात शाळा, महाविद्यालयांत वेळेत जाण्यासाठी एसटी बसेसच्या वेळापत्रकात आवश्यक तो बदल केला जाईल. विद्यार्थी तसेच पालकांना बसेसच्या वेळेबाबत काही तक्रारी, सूचना असल्यास त्या डेपोमार्फत दूर केल्या जातील, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनstate transportएसटी