१७ रेल्वेगाड्या रद्द, प्रवाशांची गैरसोय

By Admin | Updated: July 6, 2015 03:13 IST2015-07-06T03:13:20+5:302015-07-06T03:13:20+5:30

इटारसी रेल्वेस्थानकावर रुट रिले इंटरलॉकिंग कक्षाला लागलेल्या आगीमुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक अद्यापही रुळावर आली नाही.

17 trains canceled, inconvenience of passengers | १७ रेल्वेगाड्या रद्द, प्रवाशांची गैरसोय

१७ रेल्वेगाड्या रद्द, प्रवाशांची गैरसोय

नागपूर-इटारसी : १९ दिवसांपासून वाहतूक विस्कळीत
नागपूर : इटारसी रेल्वेस्थानकावर रुट रिले इंटरलॉकिंग कक्षाला लागलेल्या आगीमुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक अद्यापही रुळावर आली नाही. दरम्यान विस्कळीत झालेल्या रेल्वे वाहतुकीमुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून सोमवारी १७ रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वेगाड्यांचे संचालन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका असलेल्या रुट रिले इंटरलॉकिंग कक्षाला १७ जून रोजी आग लागली होती. त्यामुळे नागपूर-इटारसी मार्गावरील रेल्वे वाहतूक मागील १९ दिवसांपासून विस्कळीत आहे. या मार्गावरील रेल्वेगाड्या सातत्याने रद्द करण्यात येत असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. रद्द झालेल्या रेल्वेगाड्यांची माहिती मिळविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ०७१२-२५६४३४३ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला असून प्रवासाला निघण्यापूर्वी प्रवाशांनी आपली गाडी रद्द झाली काय याची खातरजमा करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय प्रवाशांच्या मदतीसाठी नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाशेजारी सहायता कक्ष सुरू केला आहे. (प्रतिनिधी)
६ जुलैला रद्द झालेल्या गाड्या
१२६४५ एर्नाकुलम-ह. निजामुद्दीन एक्स्प्रेस
१२३८९ गया-चेन्नई एक्स्प्रेस
१२४०६ ह. निजामुद्दीन-भुसावळ गोंडवाना एक्स्प्रेस
१६०३२ जम्मुतावी-चेन्नई अंदमान एक्स्प्रेस
१२७९१ सिकंदराबाद-पटना एक्स्प्रेस
२२११२ नागपूर-भुसावळ एक्स्प्रेस
१२४०९ रायगड-ह. निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस
२२३५४ बंगळुर-पटना प्रिमिअम एक्स्प्रेस
१२१९३ यशवंतपूर-जबलपूर एक्स्प्रेस
१७६०९ पटना-पुर्णा एक्स्प्रेस
१२६४७ कोईंबतुर-ह. निजामुद्दीन एक्स्प्रेस
१२६५० ह. निजामुद्दीन-यशवंतपूर संपर्कक्रांती एक्स्प्रेस
१२६४९ यशवंतपूर-ह. निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्स्प्रेस
१९३०१ इंदोर-यशवंतपूर एक्स्प्रेस : नरखेड, अमरावती मार्गे
५९३८५ इंदोर-छिंदवाडा पॅसेंजर : बैतुल, आमला, छिंदवाडा मार्गे
५९३८६छिंदवाडा-इंदोर पॅसेंजर : आमला, बैतुल मार्गे
१८२३७ बिलासपूर-अमृतसर छत्तीसगड एक्स्प्रेस

Web Title: 17 trains canceled, inconvenience of passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.