१७ हजारांच्या आमिषापोटी अडीच लाख गमावले
By Admin | Updated: June 18, 2014 01:27 IST2014-06-18T01:27:47+5:302014-06-18T01:27:47+5:30
१७ हजारांच्या आमिषापोटी एका इसमाने आपले अडीच लाख रुपये गमावले. स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत ही घटना घडली. जगदीशप्रसाद मुन्नालाल गुप्ता (वय ५७, रा़ टेकडी लाईन सीताबर्डी, नागपूर) यांनी

१७ हजारांच्या आमिषापोटी अडीच लाख गमावले
नागपूर : १७ हजारांच्या आमिषापोटी एका इसमाने आपले अडीच लाख रुपये गमावले. स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत ही घटना घडली.
जगदीशप्रसाद मुन्नालाल गुप्ता (वय ५७, रा़ टेकडी लाईन सीताबर्डी, नागपूर) यांनी ३१ मे च्या दुपारी बँकेतून अडीच लाख रुपये काढले. तेथे गुप्ता यांना एक आरोपी भेटला. त्याने आपले नाव सुनील अग्रवाल असे सांगितले. गुप्तांना विश्वासात घेत आरोपीने त्यांना बँक खात्यातून रक्कम काढली आणि पुन्हा लगेच भरली तर १७ हजार रुपये व्याज मिळेल, असे सांगितले. गुप्तांनी १७ हजारांच्या आमिषापोटी त्या आरोपीकडे अडीच लाखांची रक्कम सोपवली. आरोपीने ही रक्कम गुप्ता यांच्या खात्यात जमा केल्याचा बनाव करीत त्यांना एक खोटी पावती दिली आणि रक्कम घेऊन पसार झाला. दरम्यान, रक्कमेची गरज पडल्याने गुप्ता यांनी आपल्या खात्यात किती रोकड आहे, ते तपासले असता हा गैरप्रकार उघडकीस आला.(प्रतिनिधी)