१७ कोटींची कामे निधीअभावी प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:07 IST2021-04-05T04:07:25+5:302021-04-05T04:07:25+5:30
विधानसभा निवडणुका संपताच, दोन-तीन महिन्यात जि.प. निवडणूक, पदवीधर व ग्रा.पं. निवडणुकांच्या आचारसंहितेत व कोविडच्या महामारीमुळे आर्थिक मंदीचे सावट आहे. ...

१७ कोटींची कामे निधीअभावी प्रलंबित
विधानसभा निवडणुका संपताच, दोन-तीन महिन्यात जि.प. निवडणूक, पदवीधर व ग्रा.पं. निवडणुकांच्या आचारसंहितेत व कोविडच्या महामारीमुळे आर्थिक मंदीचे सावट आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची कामे राज्य शासनाने मंजूर करूनही आर्थिक अडचणीमुळे निधीअभावी ठप्प आहे. २०१९-२० व त्या पूर्वीच्यादेखील कामांना प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर व पूर्ण झालेल्या कामांनादेखील शासनाने अत्यंत अल्प निधी दिला. तसेच विशिष्ट काही गावांना निधी प्राप्त करून दिल्यामुळे ग्रामीण विभागाचे प्रतिनिधित्व करणारे सरपंच, पं.स सदस्य, जि.प.सदस्य कमालीचे नाराज आहेत. त्यामुळे वर्ष-दीड वर्षापूर्वी निवडून आलेले आमदार व जि.प. सदस्य आपल्या क्षेत्रामध्ये विकासाची कामे करू शकले नाहीत. मागील प्रस्तावांना व ३१ मार्च २०२० त्यानंतरही प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेल्या नागपूर जिल्ह्यातील अंदाजे १७ कोटी रुपयांच्या कामांना तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागपूर जिल्हा (ग्रा.) कॉंग्रेस कमिटी, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राहुल घरडे, नागसेन निकोसे, प्रज्ज्वल तागडे, बुद्धिमान पाटील, सुधीर पिल्लेवान आदींनी ग्रामविकास मंत्र्यांकडे केली आहे.