शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

नागपूर विद्यापीठाच्या १०४ व्या दीक्षांत समारंभात १६९ गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 9:32 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०४ वा दीक्षांत समारंभ रविवार ३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या दीक्षांत समारंभात जी.एच.रायसोनी विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी साहिल श्याम देवानी याला सर्वाधिक २० पदके व पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे३ डिसेंबर रोजी आयोजनसाहिल देवानी याला सर्वाधिक २० पुरस्कार

आॅनलाईन लोकमतनागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०४ वा दीक्षांत समारंभ रविवार ३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या दीक्षांत समारंभात जी.एच.रायसोनी विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी साहिल श्याम देवानी याला सर्वाधिक २० पदके व पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येणार आहे.३ डिसेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सांस्कृतिक सभागृहात होणाऱ्या  दीक्षांत समारंभाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ.अनिल सहस्रबुद्धे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांना पदके व पारितोषिकांचे वाटप करण्यात येणार आहे. दीक्षांत समारंभात २०१६ च्या उन्हाळी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना स्नातक व स्नातकोत्तर पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत.विधी शाखेचा वरचष्मा१०३ व्या दीक्षांत समारंभात विधी शाखेच्या विद्यार्थ्यांचाच वरचष्मा दिसून येणार आहे. जी.एच.रायसोनी महाविद्यालयाचा साहिल श्याम देवानी याचा ‘एलएलबी’मध्ये (५ वर्षीय अभ्यासक्रम) सर्वात जास्त ‘सीजीपीए’ मिळविल्याबद्दल २० पदके व पारितोषिकांनी सन्मान होणार आहे. धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय, गोंदिया येथील विद्यार्थिनी निशा देवानंद खोटेले हिला ‘बीएसस्सी’मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल १६ पदके व पारितोषिके प्रदान करण्यात येतील. तर नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शहर शाखेतील विद्यार्थिनी शीतल कौशिदास वासनिक हिला ‘एलएलबी’त (३ वर्षीय अभ्यासक्रम) सर्वात जास्त गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल १४ पदके व पारितोषिकांनी गौरविण्यात येईल.यंदा दोन ‘डी.लिट.’दरम्यान, यंदाच्या दीक्षांत समारंभात दोन ‘डी.लिट.’ प्रदान करण्यात येणार आहेत. गोंदिया येथील आर.एम.पटेल महाविद्यालयातील सेवानिवृत्त विभागप्रमुख डॉ.कादेरा तालीब शेख (जुल्फी)यांना मराठी भाषेतील संशोधनासाठी तर नागपूर विद्यापीठाच्या पाली-प्राकृत विभागप्रमुख डॉ.मालती साखरे यांना पाली भाषेतील संशोधनासाठी ही पदवी देण्यात येईल. पाली भाषेतील नागपूर विद्यापीठातील ही पहिली ‘डी.लिट.’ राहणार आहे हे विशेष.यंंदा पदवीधर घटलेयंदाच्या दीक्षांत समारंभात पदवीधरांची एकूण संख्या घटल्याचे दिसून येत असून ‘पीएचडी’ मिळणाºयांचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. दीक्षांत समारंभात २०१६ च्या उन्हाळी व हिवाळी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ५७ हजार २५९ विद्यार्थ्यांना स्नातक व स्नातकोत्तर पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत. तसेच विविध परीक्षांमधील १६९ प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना २९६ सुवर्ण पदके, ४२ रौप्य पदके, १०० पारितोषिके अशी एकूण ४३८ पदके आणि पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.मागील चार दीक्षांत समारंभांच्या तुलनेत यंदा पदवीधरांचे प्रमाण घटले आहे. मागील वर्षी पदवीधरांची संख्या ६४ हजार ४५९ इतकी होती. यंदा त्यात ७ हजार २०० म्हणजेच १०.८६ टक्के घट झाली आहे. मागील दीक्षांत समारंभात ८४२ विद्यार्थ्यांना ‘पीएचडी’ पदवी प्रदान करण्यात आली होती. या वर्षी हाच आकडा ७६९ इतका झाला आहे.

 

टॅग्स :universityविद्यापीठ