शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

विदर्भातील १६.४० लाख वीज ग्राहकांवर २६२ कोटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 20:06 IST

महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील तब्बल १६ लाख ४० हजार ९७ वीज ग्राहकांकडे वीजबिलापोटी २६२ कोटी ९७ लाख रुपयांची थकबाकी असल्याने ही थकबाकी पूर्णत: वसूल करण्यासाठी आक्रमकतेने कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देथकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करा : प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील तब्बल १६ लाख ४० हजार ९७ वीज ग्राहकांकडे वीजबिलापोटी २६२ कोटी ९७ लाख रुपयांची थकबाकी असल्याने ही थकबाकी पूर्णत: वसूल करण्यासाठी आक्रमकतेने कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी दिले आहेत.घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडील थकबाकीसोबतच मागील आर्थिक वर्षातील थकबाकी वसूल करण्यासोबतच थकबाकी भरण्यास नकार देणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करा आणि वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची नोंद प्रणालीत करण्याच्या स्पष्ट सूचनाही प्रादेशिक संचालकांनी केल्या आहेत. प्रत्येक लाईनस्टाफला थकबाकी वसुली आणि वीजपुरवठा खंडित करण्याचे दैंनंदिन लक्ष्य द्या, थकबाकी वसुली अथवा वीजपुरवठा खंडित असे दोनच पर्याय ग्राहकापुढे ठेवा, थकबाकी वसुलीत हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासोबतच काम करण्याशिवाय पर्याय नसल्याचा संदेश सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत देण्याच्या सूचनाही दिलीप घुगल यांनी केल्या आहेत. प्रत्येक कार्यकारी अभियंत्यांनी थकबाकी वसुलीसाठी रीतसर नियोजन करून त्याची योग्य अंमलबजावणी करा; सोबतच वीजपुरवठा खंडित करण्यास गेलेल्या कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.अशी आहे थकबाकीजिल्हा               वीज ग्राहक            एकूण थकबाकी--------------------------------------------------अकोला          १,६४,०५९               ३४ कोटी १० लाखबुलडाणा         २,०४,९४३              ३३ कोटी ६८ लाखवाशीम            ९१,३१५                  १८ कोटी १६ लाखअमरावती        २,४४,४८५             ४१ कोटी २२ लाखयवतमाळ        २,०१,९४३              ३३ कोटी ७९ लाखचंद्रपूर              १, २८,०१३             १७ कोटी ४३ लाखगडचिरोली        १,०६,०६५            १० कोटी ३ हजारगोंदिया            ८३,५४५                १० कोटी २४ लाखभंडारा            ८८,४६६                 ९ कोटी ६३ लाखवर्धा                 १,१०,०००               १४ कोटी ९६ लाखनागपूर ग्रामीण १,१९,५७०             २० कोटी ५६ लाखनागपूर शहर   ९७,१६७                १८ कोटी ३९ लाख

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजbillबिल