शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील १६ हजार विद्यार्थी गणवेशाविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 10:50 IST

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र संपायला आले असतानाही, जिल्ह्यात १६ हजार विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित रहावे लागले आहे. विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित राहण्यास शिक्षक व शिक्षण विभागच जबाबदार असल्याचा ठपका जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी ठेवला आहे.

ठळक मुद्देअध्यक्षांचा शिक्षकांसह शिक्षण विभागावर ठपका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र संपायला आले असतानाही, जिल्ह्यात १६ हजार विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित रहावे लागले आहे. विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित राहण्यास शिक्षक व शिक्षण विभागच जबाबदार असल्याचा ठपका जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी ठेवला आहे. गणवेशासाठी डीबीटी केवळ जि.प. मध्येच नाही, तर महापालिकेतही आहे. परंतु महापालिकेच्या शिक्षकांनी दाखविलेल्या समंजसपणामुळे महापालिकेचे विद्यार्थी गणवेशात शाळेत येत आहे. जि.प.च्या शिक्षक व शिक्षण विभागाने हा समंजसपणा दाखविला असता, तर ही नामुष्की जि.प.वर आली नसती, असे मत त्यांनी व्यक्त केले.गणवेशासाठी ४०० रुपये प्रति विद्यार्थीप्रमाणे अनुदान आहे. परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांना बँकेत खाते उघडायचे आहे. शिक्षण विभागाने गणवेशासाठी गट स्तरावर शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात गणवेशाचा २ कोटी ९२ लाखाचा निधी वळता केला आहे. गणवेशासाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते काढण्याची जबाबदारी तालुकास्तरावर गट शिक्षण अधिकारी, कें द्र प्रमुख, विस्तार अधिकारी व शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपविण्यात आले होते. कुठे विद्यार्थ्यांना खाते उघडण्यास समस्या निर्माण होत असल्यास संबंधित अधिकाºयांना बँकेकडे याबाबत पाठपुरावा करून खाते उघडून देण्याबाबत सूचना करण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. परंतु संबंधित सर्व यंत्रणेने हात काढून सर्व जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या खांद्यावर सोपविली. परंतु शिक्षकांनीही त्यात रस न दाखविल्याने अद्यापही १६ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहे.५१,०६९ विद्यार्थ्यांच्या खात्यात गणवेशाचे अनुदान वळतेजि.प. शिक्षण विभागाच्या अखत्यारित जिल्ह्यातील सुमारे १६४३ शाळेतील ७३ हजार ३७३ विद्यार्थी गणवेशासाठी पात्र होते. शैक्षणिक सत्र अंतिम टप्प्यात असूनही आजवर केवळ ५७ हजार १६४ लाभार्थी विद्यार्थ्यांचेच बँक खाते उघडू शकले आहे. यातील ५१ हजार ०६९ विद्यार्थ्यांच्या खात्यात गणवेशाचे अनुदान वळते केल्याचा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.तालुकास्तरीय अधिकाºयांचे जि.प. शाळांकडे दुर्लक्षतालुकास्तरीय गट शिक्षण अधिकारी, बीडीओ, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी यांचा ओढा जि.प.च्या शाळेपेक्षा खाजगी शाळांकडे जास्त आहे. जि.प. शाळांच्या दुर्लक्ष करणारे हे अधिकारी खाजगी शाळांच्या कार्यक्रमात हिरीरीने सहभागी होतात. खाजगी शाळांचे कौतुकही करतात, परंतु जि.प.च्या शाळांच्या विकासाकडे त्यांचे दुर्लक्ष असल्याचे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीNagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर