१६० नागरिकांना दंड करुन मनपाने दिले मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:21 IST2020-12-04T04:21:37+5:302020-12-04T04:21:37+5:30

लोकमत न्यूज् नेटवर्क नागपूर : नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १६० ...

160 citizens were fined and given masks by Manpa | १६० नागरिकांना दंड करुन मनपाने दिले मास्क

१६० नागरिकांना दंड करुन मनपाने दिले मास्क

लोकमत न्यूज् नेटवर्क

नागपूर : नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १६० नागरिकांविरुध्द कारवाई केली. त्यांच्याकडून ८० हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही दिवसात शोध पथकांनी २२२८७ नागरिकांविरुध्द कारवाई करुन ९५ लाख २ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल केला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली तरी संसर्गाचा धोका अद्याप टळला नाही. असे असून‍ही अनेक नागरिक विनामास्क फिरतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे कारवाई केली जात आहे.

पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २९, धरमपेठ २७, हनुमाननगर २५ धंतोली १०, नेहरुनगर ६, गांधीबाग १०, सतरंजीपुरा १२, लकडगंज ११, आशीनगर १३, मंगळवारी १३ आणि मनपा मुख्यालयात ४ जणांविरुध्द ही कारवाई करण्यात आली.

शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

Web Title: 160 citizens were fined and given masks by Manpa