एका ईव्हीएमवर राहणार १६ उमेदवारांची नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 13:57 IST2019-03-18T13:56:53+5:302019-03-18T13:57:40+5:30
मतदानासाठी बॅलेट पेपर जाऊन आता इव्हीएम मशीन आल्या आहेत. एका इव्हीएम मशीनवर केवळ १६ उमेदवारांचीच नावे अंकित राहू शकतील.

एका ईव्हीएमवर राहणार १६ उमेदवारांची नावे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मतदानासाठी बॅलेट पेपर जाऊन आता इव्हीएम मशीन आल्या आहेत. एका इव्हीएम मशीनवर केवळ १६ उमेदवारांचीच नावे अंकित राहू शकतील. तेव्हा एका मतदार संघात १६ पेक्षा जास्त उमेदवार असल्यास दोन ईव्हीएम मशीनचा वापर केला जाईल.
लोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतात. यासोबतच अनेक अपक्षही असतात. इव्हीएम मशीनवर एकाचवेळी केवळ १६ उमेदवारांचीच नावे अंकित करता येऊ शकतात. तेव्हा १६ पेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यास एका ठिकाणी दोन इव्हीएमचा वापर करावा लागणार आहे. अर्थात निवडणूक विभागाने त्याची तयारी आधीपासूनच केलेली आहे. नागपूर जिल्ह्यात पुरेसे ईव्हीएम मशीन उपलब्ध आहेत.