१५६ शाळांत लागणार सीसीटीव्ही
By Admin | Updated: November 22, 2014 02:18 IST2014-11-22T02:18:26+5:302014-11-22T02:18:26+5:30
जिल्हा परिषदेच्या ३०० शाळांना संरक्षक भिंत नाही. ज्या शाळा रस्त्यालगत आहेत तेथे मोकाट कुत्रे वा जनावरांचाही त्रास आहे.

१५६ शाळांत लागणार सीसीटीव्ही
नागपूर : जिल्हा परिषदेच्या ३०० शाळांना संरक्षक भिंत नाही. ज्या शाळा रस्त्यालगत आहेत तेथे मोकाट कुत्रे वा जनावरांचाही त्रास आहे. अशा शाळांतील विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने या शाळांना संरक्षक भिंत उभारून सीसीटीव्ही लावण्याचा प्रस्ताव शुक्र्र वारी शिक्षण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. सभापती उकेश चव्हाण यांनी ही माहिती दिली.
केंद्र सरकारच्या मानव संसाधन व विकास मंत्रालयाकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. विशेष बाब म्हणून या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा केंद्राकडे आग्रह धरू. तसेच या शाळांत साऊं ड सिस्टिम यंत्रणा निर्माण के ली जाणार आहे. यात लाऊ डस्पिकर, तबला-पेटी, क्रीडा साहित्य उपलब्ध करण्याचा मानस आहे. यावर सहा कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जि.प. शाळांनी स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता ती यापुढेही वर्षभर राबवा, असे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले आहे. स्वच्छता मोहिमेला प्रतिसाद मिळावा यासाठी चांगले काम करणाऱ्या शाळांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्र्रशस्तीपत्र देऊन गौरव करणार असल्याचे चव्हाण म्हणाले.
जि.प.च्या तालुकास्तरावरील शाळांत स्नेहसंमलन आयोजित केले जाते. यातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. ही बाब विचारात घेता ग्रामीण भागातील प्रत्येक शाळेत स्नेहसंमेलन आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच जि.प.च्या जास्तीतजास्त शाळांतून सेमी इंग्लिशमधून शिक्षण देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. (प्रतिनिधी)