शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेला तब्बल १५५ कोटींची सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:55 IST

नागपूर सुधार प्रन्यासने महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेला दिलेल्या भूखंडापोटी १६३ कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेले असता सक्षम प्राधिकरणाकडे सुनावणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. याचा फायदा घेत नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी ही रक्कम केवळ ८ कोटी रुपये करून राज्याच्या तिजोरीत येणाऱ्या १५५ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडले, असा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. या प्रकरणी पाटील यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली.

ठळक मुद्देविखे पाटील यांनी मांडला भूखंड घोटाळा : नगरविकास राज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

आॅनलाईन लोकमतनागपूर : नागपूर सुधार प्रन्यासने महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेला दिलेल्या भूखंडापोटी १६३ कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेले असता सक्षम प्राधिकरणाकडे सुनावणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. याचा फायदा घेत नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी ही रक्कम केवळ ८ कोटी रुपये करून राज्याच्या तिजोरीत येणाऱ्या १५५ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडले, असा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. या प्रकरणी पाटील यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली.अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विखे पाटील यांनी नगर विकास खात्याने केलेला हा घोटाळा सभागृहासमोर मांडला. ते म्हणाले, नागपूर सुधार प्रन्यासने महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा या संस्थेला दिलेल्या भूखंडावर वोक्हार्ट हे खासगी रुग्णालय सुरू आहे. या रुग्णालयाचा मागील १० वर्षातील व्यवसाय सुमारे १०० कोटींचा आहे. या भूखंडावर पूर्वी कमी भाडेपट्टी आकारण्यात आल्याने नागपूर खंडपीठाने सुधारित भाडेनिश्चिती करण्याचे आदेश दिले होते. नागपूर सुधार प्रन्यासने नवीन परिगणना करून या भूखंडाच्या व्यावसायिक वापरासाठी संबंधित संस्थांनी व्याजासह १६३ कोटी रुपये भरावे, असे निर्देश दिले. दरम्यान नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सक्षम प्राधिकरणाकडेच सोपविण्याचे निर्देश दिले होते. अशा परिस्थितीत राज्य सरकारने एका खासगी रुग्णालय सुरू असलेल्या भूखंडाच्या भाडेपट्टीत हस्तक्षेप करायला नको होता. १६३ कोटी रुपये वसूल करायचे असताना नगरविकास मंत्री रणजित पाटील यांनी तब्बल १५५ कोटींची सूट दिली व फक्त ८ कोटी देय असल्याचे आदेश दिले. हा मोठा भूखंड घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला.नागपूर सुधार प्रन्यासकडून परिगणना होत असताना महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेला सुनावणी देण्यात आली नाही, असेही राज्य सरकारच्या आदेशात नमूद आहे. परंतु, प्रत्यक्षात १८ नोव्हेंबर व ३ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या सुनावणीला संबंधित संस्था उपस्थित होत्या, असेही विखे पाटील यांनी सांगितले. आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणून सर्वसामान्य जनतेवर करवाढ लादली जाते आहे. तर दुसरीकडे एका फटक्यात तब्बल १५५ कोटी रुपयांनी कमी करून आर्थिक लाभ मिळवून दिला जात आहे. त्यामुळे राज्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला स्थगिती द्यावी, नागपूर सुधार प्रन्यासने ठरविलेल्या रकमेची तातडीने वसुली सुरू करावी व मुख्यमंत्र्यांनी तातडीने नगरविकास राज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Vidhan Bhavanविधान भवन