१५०० कोटींच्या कर्जावर शिक्कामोर्तब होणार
By Admin | Updated: March 27, 2015 01:53 IST2015-03-27T01:53:40+5:302015-03-27T01:53:40+5:30
चमूमध्ये प्रकल्प व्यवस्थापक प्रिसीले द कोनिक, प्रोजेक्ट समन्वयक ज्युलिएट पन्नेरेर आणि कार्यक्रम अधिकारी शेख दिया यांचा समावेश आहे.

१५०० कोटींच्या कर्जावर शिक्कामोर्तब होणार
चमूमध्ये प्रकल्प व्यवस्थापक प्रिसीले द कोनिक, प्रोजेक्ट समन्वयक ज्युलिएट पन्नेरेर आणि कार्यक्रम अधिकारी शेख दिया यांचा समावेश आहे. चमूचे अधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर आणि मिहानचे मुख्य अभियंता सुभाष चहांदे यांच्याकडून नागपूर विकासाची माहिती घेतली. त्यांनी मोरभवन बसस्थानक आणि वांजरा व इंदिरानगर घरकुल योजनेची पाहणी केली.
विविध प्रकल्पांचे पॉवर सादरीकरण
ही चमू सकाळी ८ वाजता बेंगळुरू येथून नागपुरात आली. सकाळी १० वाजता त्यांनी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. महापौर प्रवीण दटके यांच्या उपस्थितीत मनपाच्या विविध प्रकल्पांचे पॉवर सादरीकरण करण्यात आले. शहराचे भौगोलिक व ऐतिहासिक महत्त्व, पर्यावरण पूरक व स्वच्छ व सुंदर शहर म्हणून असलेले उद्दिष्ट, जेएनएनयूआरएम अंतर्गत पेंच टप्पा, पूर्ण झालेले प्रकल्प, २४ बाय ७ पाणीपुरवठा, सांडपाण्याचे व्यवस्थापक व पाण्यावर पुनर्प्रकिया, मलनिस्सारण प्रकल्प, पाण्याची पुनर्वापर योजना, नाग नदी स्वच्छता अभियान, मोरभवन स्थानकाचा प्रस्ताविक विकास या प्रकल्पांची माहिती श्रावण हर्डीकर आणि अधीक्षक अभियंता प्रकाश उराडे यांनी दिली तर नागपूर शहर बस वाहतुकीबाबत वंश निमयचे जयंत देशमुख यांनी सांगितले.
सौर ऊर्जेचा वापर
नागपूर शहराची मॉडेल सोलर सिटी म्हणून निवड झाली आहे. शासकीय इमारतींवर सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. प्रखर दिव्याऐवजी कमी ऊर्जेवर चालणारे एलई दिवे बदलण्यात येणार आहे. दर पौर्णिमेला रात्री एक तासाकरिता ऊर्जा बचत अभियान राबवून जनतेला सहभागी करण्यात येत आहे. शिष्टमंडळाने स्मार्ट सिटीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात,उराडे यांनी स्मार्ट सिटीचे जवळपास मुख्य निकष पूर्ण करीत असल्याचे सांगितले.