शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

नागपूर रेल्वेस्थानकावर येतात १५० गाड्या, स्वच्छता मात्र केवळ १७ रेल्वेगाड्यांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:05 IST

नागपूर रेल्वेस्थानकावरून दररोज १५० रेल्वेगाड्या ये-जा करतात. परंतु क्लीन ट्रेन सिस्टीमनुसार केवळ मोजक्या गाड्यांचीच सफाई होत आहे.

ठळक मुद्देपॅसेंजर गाड्या, जनरल कोच बेवारस, प्राथमिक देखभालीसाठी नाही प्लान्ट

आनंद शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना व्हायरसचा झपाट्याने प्रसार होत असल्यामुळे नागरिक दहशतीत आहेत. तर हजारो रेल्वे प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रेल्वेच्या वतीने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाय होताना दिसत नाही. त्यामुळे एसी आणि स्लिपर कोचच्या प्रवाशांसाठी रेल्वेस्थानकावर १७ गाड्यांची सफाई होत आहे. तर जनरल कोच आणि पॅसेंजर गाड्यांमधील प्रवाशांना कोरोनाच्या दहशतीत प्रवास करण्यासाठी सोडून देण्यात आले आहे. नागपूर विभागात सफाईसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला असता ही बाब निदर्शनास आली.रेल्वेस्थानकावर ‘क्लीन ट्रेन स्टेशन’ सिस्टीमनुसार रेल्वेस्थानकावर १५ मिनिट किंवा त्यापेक्षा अधिक काळाने रवाना होणाऱ्या गाड्यांच्या सफाईचे कंत्राट जबलपूरच्या एसएस सर्व्हिसेसला पाच वर्षांसाठी देण्यात आले आहे. कंत्राटदाराला रेल्वेगाडीच्या हिशेबाने पैसे देण्यात येतात. कंत्राटातील अटीनुसार पूर्वी २४ रेल्वेगाड्यांची सफाई करण्यात येत होती. परंतु पुढे ७ गाड्यांच्या थांब्याची वेळ १५ मिनिटांपेक्षा कमी करून त्यांना क्लीन ट्रेन स्टेशन सिस्टीममधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. सध्या केवळ १७ गाड्यांचीच सफाई होत आहे. जनरल कोचकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. एसी, स्लिपर कोचमध्येही दरवाजे, शौचालय, शौचालयाच्या बाहेरील परिसर, दरवाजाच्या समोरील भागाचीच स्वच्छता होते. एका गाडीच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदाराच्या ९ टोळ्या लागतात. एका टोळीत ३ कर्मचारी असतात.या पद्धतीने २७ कर्मचारी एका गाडीच्या सफाईचे काम करतात. काही मिनिटातच पोर्टेबल जेट मशीन, ड्राय वेट व्हॅक्युम क्लीनर, मॉपर, फिनाईलने सफाई करण्यात येते. सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत होणाºया या कामावर रेल्वे कर्मचारी लक्ष ठेवून त्याला ग्रेड देतात. ९०-१०० टक्के ग्रेड मिळाल्यास १०० टक्के पैसे आणि त्यापेक्षा कमी मिळाल्यास १० टक्के या हिशेबाने कंत्राटदाराला कमी पैसे मिळतात. हा तपासाचा भाग असला तरी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादामुळे १०० टक्के ग्रेड देण्याची शक्यता राहते. नागपूर रेल्वेस्थानकावरून दररोज १५० रेल्वेगाड्या ये-जा करतात. परंतु क्लीन ट्रेन सिस्टीमनुसार केवळ मोजक्या गाड्यांचीच सफाई होत आहे. ऑन बोर्ड हाऊस कीपिंग सर्व्हिस (ओबीएचएस) बहुतांश रेल्वेगाड्यात सुरू करण्यात आली आहे.यात रेल्वे कर्मचारी सकाळी ६ ते रात्री १० दरम्यान सफाई करतात. प्रवाशांच्या सूचनेनुसारही कोचची स्वच्छता करतात.हे कर्मचारी रेल्वेगाडी जिथून निघते तिथून गाडीत चढतात आणि अखेरच्या स्टेशनपर्यंत गाडीतच राहतात. ओबीएचएसअंतर्गत बहुतांश रेल्वेगाड्यांची सफाई होत असल्याचा दावा अधिकारी करीत आहेत. परंतु अद्यापही पॅसेंजर गाड्या म्हणजे नागपूर-इटारसी पॅसेंजर, नागपूर- अमरावती पॅसेंजर, नागपूर-भुसावळ पॅसेंजरमध्ये ही सिस्टीम लागू झालेली नाही. नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, गरिबरथ एक्स्प्रेस या गाड्यातही ओबीएचएस लागू आहे. या गाड्या रात्री नागपूरवरून रवाना होऊन सकाळी अंतिम स्थानकावर पोहोचतात.अशास्थितीत या गाड्यात ओबीएचएसचे कर्मचारी पाठविण्याची आवश्यकता नाही. प्रायमरी मेन्टेनन्समध्ये नागपूर आणि अजनीवरून सुटणाऱ्या आणि येथे समाप्त होणाºया गाड्यांची देखभाल करण्यात येते. परंतु या गाड्या जेथे समाप्त होतात तेथे त्यांचे सेकंडरी मेन्टेनन्स होते. नागपूर-अजनीत ज्या गाड्यांचे प्रायमरी मेन्टेनन्स होते, त्यात या गाड्यांची आतून आणि बाहेरून सफाई होते. यात नागपूर-मुंबई दुरांतो, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, नागपूर-पुणे गरिबरथ एक्स्प्रेस, नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेस, आमला पॅसेंजर, इटारसी पॅसेंजर, अजनी-पुणे हमसफर, अजनी-एलटीटी एक्स्प्रेस, नागपूर-रिवा एक्स्प्रेस, नागपूर-अमृतसर प्रीमियम एक्स्प्रेस, नागपूर-जयपूर व्हाया अजमेर एक्स्प्रेसचा समावेश आहे. तर इंदोर एक्स्प्रेस, अमरावती-नागपूर पॅसेंजर, कोल्हापूर-नागपूर व्हाया पंढरपूर एक्स्प्रेस, नागपूर-भुसावळ व्हाया खंडवा एक्स्प्रेसमध्ये सेकंडरी मेन्टेनन्स करण्यात येते. प्रायमरी मेन्टेनन्सध्ये गाड्याची आतून-बाहेरून सफाई होत असून, सेकंडरी मेन्टेनन्समध्ये केवळ दाखविण्यासाठी सफाई होत आहे. प्रायमरी मेन्टेनन्ससाठी नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ७ च्या जवळ २००७ मध्ये ३५ लाख रुपयांचा वॉशिंग प्लान्ट तयार करण्यात आला. परंतु जुना झाल्यामुळे हा प्लान्ट हटविण्यात आला. या ठिकाणी नवा प्लान्ट होणार आहे. तोपर्यंत कंत्राटदाराच्या माध्यमातून रेल्वेगाड्यांची सफाई होत आहे.

कोरोनापासून कशी होणार सुरक्षा?कोरोनापासून बचावासाठी गाड्यांची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कॅरेज अँड वॅगन विभागाने मास्क, सॅनिटायझर दिलेले नाही. तर प्रवाशांच्या थेट संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ते पुरविण्यात आले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचा पुरवठा करण्याची संघटनांची मागणी आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर