शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘पेम्फिगस’मुळे १५ टक्के मृत्यू : रज्जाक अहमद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:00 IST

‘पेम्फिगस’ हा दुर्लभ त्वचा विकारांचा एक समूह आहे. जो तोंडाच्या आतपासून ते गुप्तांगसारखी त्वचा व संपूर्ण शरीरावर होतो. हा वेदनादायी व दिसायला भयानक असतो. कुठल्याही वयात हा आजार होत असलातरी मध्यम वयात हा सर्वाधिक दिसून येतो. पूर्वी या आजाराच्या रुग्णांचे १०० टक्के मृत्यू व्हायचे,परंतु आता योग्य व प्रभावी औषधोपचारामुळे हे प्रमाण १० ते १५ टक्क्यांवर आले आहे, अशी माहिती ‘सेंटर फॉर ब्लिस्टरिंग डिसीज’चे संचालक डॉ. रज्जाक अहमद यांनी येथे दिली.

ठळक मुद्दे‘क्युटीकॉन’ला हजारावर त्वचारोग तज्ज्ञाचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘पेम्फिगस’ हा दुर्लभ त्वचा विकारांचा एक समूह आहे. जो तोंडाच्या आतपासून ते गुप्तांगसारखी त्वचा व संपूर्ण शरीरावर होतो. हा वेदनादायी व दिसायला भयानक असतो. कुठल्याही वयात हा आजार होत असलातरी मध्यम वयात हा सर्वाधिक दिसून येतो. पूर्वी या आजाराच्या रुग्णांचे १०० टक्के मृत्यू व्हायचे,परंतु आता योग्य व प्रभावी औषधोपचारामुळे हे प्रमाण १० ते १५ टक्क्यांवर आले आहे, अशी माहिती ‘सेंटर फॉर ब्लिस्टरिंग डिसीज’चे संचालक डॉ. रज्जाक अहमद यांनी येथे दिली.यवतमाळ जिल्ह्यातील वणी या गावात जन्मलेले डॉ. अहमद हे अमेरिकेच्या बोस्टन येथे केवळ ‘पेम्फिगस’ याच आजारावर वैद्यकीय सेवा देतात. त्यांनी या आजारावरचे जनुकदोष, प्रोटीन्स व औषधे शोधून काढल्याने जगात त्यांचा नावलौकिक आहे. महाराष्ट्र राज्य त्वचारोग, गुप्तरोग व कुष्ठरोग विशेषज्ञाची वार्षिक परिषद ‘क्युटीकॉन-२०१८’ मध्ये सहभागी झाले असताना ते ‘लोकमत’शी बोलत होते.‘पेम्फिगस’ या आजारात रोगप्रतिकारशक्ती चुकीने ‘अँटीबॉडी’ तयार करते. जी आपली त्वचा आणि श्लेष्म पडद्यामधील निरोगी पेशींवर हल्ला करते. डॉ. अहमद यांनी या आजारावर शोधून काढलेल्या औषधोपचाराने पुन्हा आजार होत नाही. या आजारावर त्यांनी आतापर्यंत ४०० शोधनिबंध सादर केले आहे. अमेरिकेत या आजाराच्या रुग्णांची संख्या कमी आहे, परंतु भारतात मोठी संख्या आहे. यामुळे त्वचारोग तज्ज्ञाना या आजाराची व उपचाराची माहिती असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.वेळच डॉक्टर व रुग्णांकडे नाहीबदलत्या काळात सर्वच भावनिक बंध क्षीण होत आहेत. हीच गोष्ट दुर्दैवाने डॉक्टरी पेशातसुद्धा आली आहे. त्यामुळे या पेशाला विक्रता आणि ग्राहक हे स्वरूप घेऊ पाहात आहे. डॉक्टर आणि रुग्णाचा संबंध हा विश्वासावर आधारीत आहे आणि हा विश्वास रुजविण्यासाठी दोघांमध्ये वेळेची गरज आहे. परंतु ही वेळच डॉक्टर आणि रुग्णांकडे नाही. त्यामुळे वादाला तोंड फुटत आहे,असेही डॉ. अहमद म्हणाले.परिषदेच्या आयोजनासाठी डॉ. विक्रांत सावजी, डॉ. रिझवान हक, डॉ. ई.के मुकादम, डॉ. सुधीर मामीडवार, डॉ. सुशील पांडे, डॉ. किरण गोडसे, डॉ. मनोज वाघमारे, डॉ. मोहन शेंदरे, डॉ. प्राची मत्ते, डॉ. जयंत लांजेवार, डॉ. विनोद तितरमारे, डॉ. जयेश मुखी, डॉ. नितीन बरडेआदी परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर