१७ पैकी १५ उमेदवार बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:10 IST2021-09-23T04:10:29+5:302021-09-23T04:10:29+5:30
कळमेश्वर : कळमेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत १५ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने यावेळीही कृषी ...

१७ पैकी १५ उमेदवार बिनविरोध
कळमेश्वर : कळमेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत १५ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने यावेळीही कृषी उत्पन्न बाजार समितीवर केदार गटाचेच वर्चस्व अबाधित राहिले आहे. तर भाजपा समर्थित गटाकडून निवडणूक रिंगणात उभे केलेल्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बाजार समितीची स्थापना १९६४ ला झाली होती, तर १९६९ ला प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीवर केदार गटाचेच वर्चस्व राहिले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३ ऑक्टोबरला होऊ घातलेल्या १७ जागांच्या निवडणुकीत सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून ११, व्यापारी मतदारसंघातून २ तर ग्रामपंचायत मतदारसंघातून ४ जागेसाठी मतदान होणार होते. या निवडणुकीसाठी केदार गटाकडून १७ जागेसाठी तर भाजपाकडून १३ जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. तसेच २ जागेवर स्वतंत्ररीत्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यापैकी छाननीदरम्यान भाजपा समर्थित गटाचे २ उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. तर उर्वरित ११ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने केदार गटाचे १५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून विद्यमान सभापती बाबाराव पाटील, वासुदेव निंबाळकर, संजय ठाकरे, विजय ठाकरे, प्रभाकर रानडे, शंकरराव देशमुख, नरेश गोतमारे, प्रशांत निंबाळकर, काशीराव भक्ते, जिजाबाई निंबाळकर, माधुरी श्रीखंडे सोबतच अडते व्यापारी मतदारसंघातून ज्ञानेश्वर काळे, विनोद पवार तर ग्रामपंचायत मतदार संघातून चार जागेपैकी प्रदीप चणकापुरे, राजेश माडेकर अविरोध निवडून आले आहेत. या मतदार संघातून स्वतंत्र उमेदवारांनी शेवटपर्यंत उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे दोन जागेसाठी निवडणूक होणार आहे.