ट्रॅव्हल्स उलटून १५ जण जखमी

By Admin | Updated: May 4, 2015 02:27 IST2015-05-04T02:27:44+5:302015-05-04T02:27:44+5:30

नागपूरहून सावनेरला साक्षगंधासाठी येत असलेल्या मंडळींची भरधाव खासगी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर चढली.

15 injured in travel | ट्रॅव्हल्स उलटून १५ जण जखमी

ट्रॅव्हल्स उलटून १५ जण जखमी


सावनेर : नागपूरहून सावनेरला साक्षगंधासाठी येत असलेल्या मंडळींची भरधाव खासगी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर चढली. ही बस अंदाजे १०० फूट फरफटत गेल्यावर उलटली. यात १५ जण गंभीर तर १० जण किरकोळ जखमी झाले. सर्व जखमींना नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. हा अपघात नागपूर - सावनेर महामार्गावरील पाटणसावंगी परिसरात रविवारी रात्री ८.२५ वाजताच्या सुमारास झाला.
सैयद इरफान (२४), इरशाद अली (२५), इशाक कुरेशी (५५), मोहम्मद सैयद (२७), फिरोज खान (२६), सैयाद अली (१९), फरजाद अली (२२), अब्दुल सलोखी (२२), मोहंमद अली (४१), नौशाद अली (२२), मोहम्मद अबी (२१), रियाकत अली (३५), शेख सैयाद (२५), सैयद जाफर (२४), शेख जावेद (३०) सर्व रा. नागपूर अशी गंभीर जखमींची नावे असून, शेख बब्बू (७०), मोहम्मद शफी (५८), मोहम्मद अन्सारी (६२), अब्दुल हकीम (८०), शेख हफीज (५०) यांच्यासह अन्य पाच जण किरकोळ जखमी झाले. हसनबाग नागपूर येथील रहिवासी हाजी रज्जब अली यांच्या मुलाचे लग्न (निकाह) जुला धान्यगंज सावनेर येथील शफी शेख यांच्या मुलीशी जुळले आहे. त्यामुळे ही सर्व मंडळी साक्षगंधासाठी नागपूरहून सावनेरला येण्यासाठी एमएच-४३/एच-१९६२ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने निघाले होते.
दरम्यान, ही भरधाव ट्रॅव्हल्स नागपूर - सावनेर महामार्गावरील पाटणसावंगी परिसरात असलेल्या माऊंट फोर्ड आयटीआजवळ पोहोचताच चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ही भरधाव दुभाजकावर चढली. ही बस वेगात असल्याने ती दुभाजकार १०० फूट दूरपर्यंत फरफटत गेला आणि उलटली. त्यात या बसमधील १५ जण गंभीर तर, १० जण किरकोळ जखमी झाले.
अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत सावनेर व महामार्ग पोलिसांना सूचना दिली. माहिती मिळताच सावनेर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पोटे आणि महामार्ग पोलीस विभागाचे सहायक फौजदार राठोड घटनास्थळी पोहोचले.
त्यांनी नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना बसमधून बाहेर काढले. काहींना नागपूर येथील मेयो रुग्णालय आणि काहींना सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविले. या बसमध्ये एकूण ५० जण होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघात होताच बसचालक पसार झाला. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. (तालुका/प्रतिनिधी)

Web Title: 15 injured in travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.