१५ एक्स्प्रेस ट्रेन, ११ मेमू पॅसेंजर पूर्ववत; प्रवाशांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2022 20:15 IST2022-07-12T20:14:48+5:302022-07-12T20:15:14+5:30
Nagpur News दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने यापूर्वी रद्द केलेल्या १५ एक्स्प्रेस आणि ११ मेमू रेल्वे गाड्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.

१५ एक्स्प्रेस ट्रेन, ११ मेमू पॅसेंजर पूर्ववत; प्रवाशांना दिलासा
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने यापूर्वी रद्द केलेल्या १५ एक्स्प्रेस आणि ११ मेमू रेल्वे गाड्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. १२ जुलैपासून हा निर्णय अंमलात येणार आहे. रेल्वेगाड्या सुरळीत पुन्हा सुरू होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
सुरू होणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये गाडी क्रमांक १८२३५ भोपाळ बिलासपूर एक्स्प्रेस, १८२४७ बिलासपूर रीवा एक्स्प्रेस, ११२६५ जबलपूर अंबिका एक्स्प्रेस, २२८६६ पुरी एलटीटी साप्ताहिक एक्स्प्रेस १२ जुलैपासून सुरू होणार आहे.
१८२३६ बिलासपूर भोपाळ एक्स्प्रेस, १८२४८ रिवा-बिलासपूर एक्स्प्रेस, ११२६६ अंबिकापूर जबलपूर एक्स्प्रेस आणि २२१६९ रानी कमलापती संतरागाछी साप्ताहिक एक्स्प्रेस १३ जुलैपासून सुरू होणार आहे.
२२१७० संतरागाछी राणी कमलापती साप्ताहिक एक्स्प्रेस, १२८८० भुवनेश्वर-लोकमान्य द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस, २२८६५ एलटीटी-पुरी साप्ताहिक एक्स्प्रेस आणि २०८४५ बिलासपूर बिकानेर द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस १४ जुलैपासून सुरू होणार आहे. १२८१२ हटीया एलटीटी द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस १५ जुलैपासून सुरू होणार आहे. १२८७९ एलटीटी भुवनेश्वर श्री साप्ताहिक एक्स्प्रेस १६ जुलैपासून तर १२८११ एलटीटी हटिया साप्ताहिक एक्स्प्रेस १७ जुलैपासून सुरू होईल.
मेमू पॅसेंजर
०८७३८ आणि ०८७३७ बिलासपूर-रायपूर-बिलासपूर, ०८७४० शहडोल बिलासपूर, ०८७०९ रायपूर डोंगरगड, ०८८६१ गोंदिया झाडसुगुडा मेमू पॅसेंजर सुरू करण्यात आली असून, ०८७३९ बिलासपूर शहडोल, ०८७१० डोंगरगड-रायपूर आणि ०८८६२ झारसुगुडा-गोंदिया मेमू पॅसेंजर १२ जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती दक्षिण पूर्व-मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
---