शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

वाहतूकदारांच्या संपामुळे १५ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 10:37 PM

डिझेलच्या किमती कमी करा आणि जीएसटीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसअंतर्गत ‘नागपूर ट्रकर्स युनिटी’च्या वाहतूकदारांनी शुक्रवारी आंदोलनादरम्यान ‘चक्का जाम’ केला. आंदोलनामुळे नागपुरात जवळपास १५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती असोसिएशनने दिली.

ठळक मुद्देजीवनावश्यक वस्तूंना वगळले : नागपूर ट्रकर्स युनिटीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डिझेलच्या किमती कमी करा आणि जीएसटीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसअंतर्गत ‘नागपूर ट्रकर्स युनिटी’च्या वाहतूकदारांनी शुक्रवारी आंदोलनादरम्यान ‘चक्का जाम’ केला. आंदोलनामुळे नागपुरात जवळपास १५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती असोसिएशनने दिली.पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करावा आणि इंधनाच्या निरंतर होणाऱ्या दरवाढीवर नियंत्रण आणावे, केरोसिनवर अनुदान द्यावे आणि अन्य मागण्यांसाठी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने २० जुलैपासून बेमुदत संप पुकारला आहे. थर्ड पार्टी विमा कमी करावा, टोल नाक्यावर असामाजिक तत्त्वांचा वावर थांबवावा, नाक्यावरील शुल्क कमी करावे, या असोसिएशनच्या मागण्या आहेत. या मागण्यांवर निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याच्या अटीवर नागपूर ट्रकर्स युनिटी संघटना आंदोलनात सहभागी झाली.युनिटीतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांची यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर युनिटीच्या पदाधिकाऱ्यांनी वडधामना येथील टोल नाक्यावर नारेबाजी केली. वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना आंदोलनाची माहिती देऊन वाहतूक बंद केली. यावेळी नागपूर ट्रकर्स युनिटीचे अध्यक्ष कुक्कू मारवाह, सचिव रजिंदरसिंह सैनी, प्रीतमसिंह सैनी, महेंद्र जैन, महेंद्र लुले, अवतार सिंह, महेंद्रबाल सिंह, टोनी जग्गी, गुरुदयालसिंह पड्डा आणि असोसिएशनचे इतर पदाधिकारी आणि वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

२५० खासगी बसची चाके थांबली

ट्रॅव्हल्स असोसिएशन आॅफ नागपूरने या संपाला एक दिवस समर्थन देऊन शुक्रवारी कडकडीत बंद पाडला. यामुळे शहरातील सुमारे २५०वर खासगी बसची चाके थांबली होती. याचा फटका शेकडो प्रवाशांना बसला. खासगी बसच्या संपामुळे प्रवाशांनी एसटी स्थानकांवर गर्दी केली होती. सर्वच बसेस क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन धावत होत्या. अवैध प्रवासी वाहतूकही आज जोरात सुरू होती. स्कूल बस असोसिएशन संपापासून दूरआॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्या संपात स्कूल बस असोसिएशनने पाठिंबा दर्शविला असला तरी नागपूरचा ‘शालेय विद्यार्थी बस वाहतूकदार कल्याणकारी संघ’ संपापासून दूर होता. संघाचे अध्यक्ष राजेंद्र सिंग म्हणाले, राज्याच्या स्कूल बस असोसिएशनने आम्हाला न विचारता हा निर्णय घेतला, शिवाय आमच्या मागण्यांचाही यात समावेश नव्हता. यामुळे असोसिएशन संपात सहभागी झाली नाही. 

खासगी बसचे एक दिवसीय समर्थनआॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्या संपाला आम्ही शुक्रवारी एक दिवसीय समर्थन दिले होते. यात आमची स्वतंत्र मागणी नव्हती, परंतु त्यांच्या मागणीला आम्ही समर्थन दिले आहे. एक दिवसाच्या संपामुळे २००-२५० बसची चाके थांबल्याने शेकडो प्रवाशांना फटका बसला.महेंद्र जैन अध्यक्ष ट्रॅव्हल्स असोसिएशन आॅफ नागपूर

मालवाहतूकदारांची अवस्था शेतकऱ्यांसारखीमालवाहतूक व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. डिझेलचे वाढते भाव आणि टोलचा भुर्दंड आता सहन करण्यापलीकडे गेला आहे. मालवाहतूकदारांची अवस्था विदर्भातील शेतकऱ्यांसारखी झाली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही.कुक्कू मारवाहअध्यक्ष, नागपूर ट्रकर्स युनिटी

टॅग्स :Travelप्रवासStrikeसंप