नागपूर : देशात नामांकित इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) आता मिहानमध्ये सुरू होणार आहे. ते नागपुरातील १४ आणि महाराष्ट्रातील पहिले ठरणार आहे. बुधवारी आयआयएमचे संचालक आणि केंद्रीय मानव संशाधन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मिहानमध्ये २०० एकर जागेची पाहणी केली. येथील आधुनिक पायाभूत सुविधांना त्यांनी पसंती दिली. पाहणी अहवाल १५ ते ३० मार्चदरम्यान केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अमरजित ेिसन्हा, ‘आयआयएम-अहमदाबाद’चे संचालक प्रा. आशिष नंदा, राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी व एमएडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा, तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे, व्हीएनआयटीचे संचालक विश्राम जामदार यांनी मिहानमध्ये जमिनीची पाहणी केली. अखेर प्रयत्नांना यशमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नानंतर मिहानमध्ये आयआयएम स्थापन करण्यासाठी २०० एकर जागेची निवड करण्यात आली. केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाच्या निर्देशानंतर जागा निवडीची कवायत सुरू झाली. यासाठी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा आणि त्यांच्या चमूने व्हीएनआयटीमध्ये अस्थायी व्यवस्थापनासाठी जागेची पाहणी केली. नागपुरात मिहानव्यतिरिक्त २०० एकर जागा अन्य कुठेही नाही. त्यामुळेच मिहानच्या नॉन एसईझेडमधील जागेवर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे.
१४ वे आयआयएम मिहानमध्ये
By admin | Updated: February 12, 2015 02:14 IST