१४.८० लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:10 IST2021-02-12T04:10:05+5:302021-02-12T04:10:05+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : पाेलिसांनी नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील खुमारी येथील टाेल नाका परिसरात केलेल्या कारवाईमध्ये गुरांच्या अवैध वाहतुकीचा ...

14.80 lakh confiscated | १४.८० लाखाचा मुद्देमाल जप्त

१४.८० लाखाचा मुद्देमाल जप्त

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : पाेलिसांनी नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील खुमारी येथील टाेल नाका परिसरात केलेल्या कारवाईमध्ये गुरांच्या अवैध वाहतुकीचा कंटेनर पकडला. त्यात चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, कंटेनरमधील ६० गुरांची सुटका करीत एकूण १४ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई नुकतीच करण्यात आली.

साऊद उस्मान खान (३१, रा. सोनिया गांधी कॉलनी, ॲशबाग स्टेडियम भोपाळ, मध्य प्रदेश), आझम पप्पीरियाज बक्ष (३१, रा. बाफरद तब्झा, भोपाळ, मध्य प्रदेश), अझरुद्दीन वहीद खान (२६, रा. भोरास, ता. बेरशिया, भाेपाळ, मध्य प्रदेश) व आबिद कमरअली खान (१८, रा. सिरोंच, ता. नटरेन, जिल्हा विदिशा, मध्य प्रदेश), अशी आराेपींची नावे आहेत. रामटेक पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना नागपूर-जबलपूर महामार्गावरून मध्य प्रदेशातून नागपूरच्या दिशेने गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती.

दरम्यान, पाेलिसांनी या महामार्गावरील खुमारी टाेल नाका परिसरात नाकाबंदी करून एचआर-५५/टी-१२१४ क्रमांकाचा कंटेनर थांबवून झडती घेतली. त्यात त्यांना ६० जनावरे काेंबली असल्याचे निदर्शनास आले. ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे तसेच त्यातील सर्व जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचे स्पष्ट झाल्याने, पाेलिसांनी वाहनासह जनावरे ताब्यात घेत चाैघांविरुद्ध गुन्हा नाेंदविला. या कारवाईमध्ये १० लाख रुपये किमतीचा कंटेनर आणि ४ लाख ८० हजार रुपये किमतीची जनावरे असा एकूण १४ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार प्रमाेद मकेश्वर यांनी दिली. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला असून, ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे, उपनिरीक्षक प्रमाेद राऊत, गाेविंद खांडेकर, रूपेश शेंद्रे, आकाश शिरसाठ, अतुल बांते, राजू पाेले यांच्या पथकाने केली.

Web Title: 14.80 lakh confiscated