शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

१४,४०० मेगावॉट सौर वीजनिर्मिती करणारच; ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 19:26 IST

राज्याचे सौर ऊर्जा निर्मितीचे धोरण असून १४ हजार ४०० मेगावॉट अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करणारच. एवढ्यामोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा निर्मिती करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे अशी माहिती उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली.

ठळक मुद्दे२५ हजार मेगावॉट वीजनिर्मितीचे नियोजन

आॅनलाईन लोकमतनागपूर: राज्याचे सौर ऊर्जा निर्मितीचे धोरण असून १४ हजार ४०० मेगावॉट अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करणारच. यापैकी ७ हजार मेगावॉट सौर ऊर्जानिर्मिती सध्या सुरु आहे. एवढ्यामोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा निर्मिती करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. २५ हजार मेगावॉट पारंपरिक वीजनिर्मितीचे नियोजनही के ले जात आहे. अशी माहिती उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली.सदस्य आनंदराव पाटील, हेमंत टकले, डॉ. नीलम गोºहे, भाई जगताप व अन्य आमदारांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत कोळसा टंचाईमुळे वीजनिर्मिती संच बंद करावे लागत आहे. त्यामुळे विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने भारनियमन करावे लागत असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.या प्रश्नावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, सप्टेंबरमध्ये कोळसा खाणीमध्ये पाणी साचल्यामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटामुळे पुरेसा कोळसा पुरवठा झाला नाही. केवळ महानिर्मितीच नव्हे तर खाजगी वीजनिर्मिती कंपन्यांनाही कोळसा मिळाला नाही. परिणामी एक आठवडाभर भारनियमन करावे लागले. पण आता ५ ते ७ दिवसाचा कोळसा साठा उपलब्ध आहे. २० ते २२ दिवसांचा साठा उपलब्ध राहावा, असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे भारनियमन होणार नाही. राज्याने सौर ऊर्जचे धोरण आणले आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमधून वीजनिर्मितीवर राज्याचा भर आहे. अणु ऊर्जा प्रकल्प हा विषय केंद्र शासनाचा असून केंद्र शासनाने अणुऊर्जा प्रकल्प निर्माण केले तर राज्याला गरज असल्याचे केंद्र शासनाला सांगण्यात येईल, असेही ऊजामंत्र्यांनी सदस्य शरद रणपिसे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.सध्या राज्याकडे २०२० -२०२१ पर्यंत पुरेल एवढी वीज असून २०३० पर्यंत लागणाºया २५ हजार मेगावॉट वीजनिर्मितीचे नियोजन शासन करीत आहे. परदेशातील कोळसा वापरण्याबद्दलच्या आ. जयंत पाटील यांच्या प्रश्नाच्या उत्तरात ऊजामंत्री म्हणाले, आयात केलेल्या परदेशी कोळसा वापरावर केंद्र शासनाने बंधन घातले आहे. पण २० टक्के परदेशी व ८० टक्के वेकोलिचा कोळसा मिसळण्यासाठी केंद्राला परवानगी मागू. भाई गिरकर यांच्यासह अन्य आमदारांनी या प्रश्नाच्या चर्चेत भाग घेतला.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७